Gold Silver Price 28 May 2024 | ग्राहकांना दिलासा नाहीच..!; सोने चांदीच्या किंमतीत पुन्हा वाढ

0
35
Gold Silver Price 28 May 2024
Gold Silver Price 28 May 2024

Gold Silver Price 28 May 2024 |  गेल्या आठवड्यात सोने चांदीत घसरण सुरू असल्याने ग्राहकांना काहीसा दिलासा मिळाला. हे दर आणखी खाली उतरावे, अशी अपेक्षा खरेदीदारांकडून व्यक्त होत असतानाच या आठवड्यात सोने चांदीने पुन्हा दरवाढीकडे कूच केली आहे. या आठवड्याच्या सुरुवातीलाच किंमतीत वाढ होताना दिसत आहे. मागील आठवड्यात सोने ७५ हजारांवर तर, चांदी ९६ हजारांवर पोहोचली होती. या आठवड्यात किंमतीत घसरण होते की दर आणखी वाढतील याकडे अता सर्वांचेच लक्ष लागलेले आहे. असे आहेत आजचे सोने चांदीचे दर (Gold Silver Price 28 May 2024)

Gold Silver Price 28 May 2024 | सोन्यात दरवाढ 

मागील आठवड्यात सोने ७५ हजारांच्या घरात होते. सुरुवातीला दर वधारले असले. तरी नंतर मात्र त्यात काही प्रमाणात घसरण दिसून आली. गेल्या आठवड्यात सोने २७०० रुपयांनी स्वस्त झाल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला. आठवड्याच्या शेवटी भाव स्थिर होते, तर या आठवड्याच्या सुरुवातीला २७ मे रोजी सोन्यात किंमतीत २७० रुपयांची वाढ झाली. दरम्यान, गुडरिटर्न्सनुसार, आज २२ कॅरेट प्रति १० ग्रॅम सोने ६६,८०० रुपये आणि २४ कॅरेट प्रति १० ग्रॅम सोने ७२,८६० रुपये असे आहे.(Gold Silver Price 28 May 2024)

Gold Silver Price 24 May 2024 | ग्राहकांसाठी आनंदवार्ता; सोने चांदीत मोठी घसरण

चांदीही महागली

गेल्या महिनाभरापासून चांदीच्या दरांत जोरदार वाढ सुरू होती. तर, मागील आठवड्यात चांदीच्या किंमतीतही काही प्रमाणात घसरण दिसून आली. सोन्यात २ हजारांची तर, चांदीत ६ हजारांची घसरण झाली. या आठवड्याच्या सुरुवातीला सोन्यासोबतच चांदीनेहे दरवाढीकडे कूच केली असून, २७ मे रोजी चांदी १,५०० रुपयांनी महाग झाली. दरम्यान, आज गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा दर हा ९३,००० रुपये असा आहे.

असा आहे १४ ते २४ कॅरेटचा भाव 

इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA), असे आहेत प्रति कॅरेट सोन्याचे दर…

२४ कॅरेट (प्रति १० ग्रॅम) – ७२,१९१ रुपये,

२३ कॅरेट (प्रति १० ग्रॅम) – ७१,९०२ रुपये,

२२ कॅरेट (प्रति १० ग्रॅम) – ६६,१२७ रुपये,

१८ कॅरेट (प्रति १० ग्रॅम) – ५४,१४३ रुपये,

१४ कॅरेट (प्रति १० ग्रॅम) – ४२,२३२ रुपये असा आहे.

तर, एक किलो चांदीचा भाव हा ९०,८११ रुपये असा आहे. (Gold Silver Price 28 May 2024)

(टीप – वरील दर हे सूचक असून, त्यात कुठल्याही करांचा समावेश नाही. अचूक दरांसाठी स्थानिक ज्वेलरसोबत संपर्क साधावा.)

Gold Silver Price 22 May 2024 | सोने चांदीची घसरण थांबली; असे आहेत सोने चांदीचे दर


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here