Deola | देवळा – नाशिक रस्त्यावर चालत्या कारला आग; चालकाच्या सतर्कतेने दुर्घटना टळली

0
79
Deola
Deola

सोमनाथ जगताप – प्रतिनिधी : देवळा |  देवळा (Deola) – नाशिक (Nashik) रस्त्यावर सह्याद्री पेट्रोल पंपाजवळ सोमवार (दि. २७) रोजी दुपारच्या सुमारास नाशिकहुन देवळ्याच्या दिशेने येत असलेल्या इंडिगो गाडी (एम.एच १८ एस.३३३३) या चालत्या कारच्या इंजिनला अचानक आग लागली. वाहनाला आग लागल्याचे चालक दादाजी भावराव पवार (रा. गुंजाळनगर) यांच्या लक्षात येताच त्यांनी आपले वाहन रस्त्याच्या कडेला उभे केले. या घटनेची माहिती देवळा नगरपंचायतीच्या अग्निशामन विभागाला दिल्यानंतर लागलीच अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेऊन आग विझवली. अग्निशामक दलाचे जवान राजू शिलावट, दीपक सूर्यवंशी, सुनील शिलावट यांनी आग विझवण्यासाठी परिश्रम घेतले. सध्या उष्णतेचे प्रमाण भरपूर असल्याने उन्हामध्ये वाहन चालवताना नागरिकांनी सतर्कता बाळगण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here