Gold Rate Today | काल चढ तर, आज उतार; असे आहेत आजचे सोने-चांदीचे दर

0
24
Gold Silver Price 28 May 2024
Gold Silver Price 28 May 2024

Gold Rate Today |  गेल्या वर्षाच्या शेवटच्या आठवड्यात सोन्याच्या किंमतींमध्ये काही प्रमाणात घसरण झाली होती. त्यामुळे काही दिवस सोने-चांदीच्या किंमती या स्थिर होत्या. दरम्यान, यामुळे खरेदीदारांना मोठा दिलासा मिळाला होता. मात्र, काल पुन्हा सोन्याच्या किंमतींमध्ये काही प्रमाणात वाढ झाली. या नवीन वर्षाची सुरुवातीलाच सोन्याने दारवाढीची सलामी दिल्याने ग्राहकांचा हिरमोड झाला होता.(Gold Rate Today)

मात्र आज पुन्हा सोन्याच्या दरांमध्ये घसरण झाल्याचे पाहायला मिळत आहे. नवीन वर्षातही सोने आणि त्या पाठोपाठ चांदीची दारवाढीची घौडदौड ही कायम होती. मात्र, काल या नवीन वर्षाचे स्वागतदेखील दरवाढीच्या सलामीने झाले होते. पण या दरवाढीला आज ब्रेक लागला आहे. दरम्यान, आज असे आहेत सोने-चांदीचे दर… (Gold Rate Today)

Gold Price Today | नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच सोने महागले; असे आहेत आजचे दर

Gold Rate Today | सोन्याच्या दरांमध्ये अशी झाली घसरण 

मागील वर्षी डिसेंबर महिन्याच्या शेवटी सोन्याच्या दरांमध्ये तब्बल ७०० रुपयांची भर पडली आहे. तिच घोडदौड ही नवीन वर्षातही कायम होती. तर, काल सोने २७० रुपयांनी वाढले होते. आणि आज या सोन्याच्या दरवाढीला ब्रेक लागला आहे. दरम्यान, आज हे भावांमध्ये २७० रुपयांची घसरण झाली. गुडरिटर्न्सनुसार, आज २२ कॅरेट प्रति १० ग्रॅम सोन्याचे दर हे  ५६,६५० रुपये असे आहेत. तर, तर २४ कॅरेट प्रति १० ग्रॅम सोन्याचा भाव हा आज ६३,९७० रुपयांवर पोहोचला आहे.(Gold Rate Today)

चांदी इतकी झाली स्वस्त 

गेल्या वर्षात शेवटच्या आठवड्यात आठवड्यात चांदीच्या दरांमध्ये १,१०० रुपयांची भर पडली आहे. तर, आता पुन्हा नवीन वर्षात चांदीच्या किंमतीनी मुसंडी मारली आहे. दरम्यान, या वर्षात २ जानेवारी रोजी चांदीचा दर हा ३०० रुपयांनी वाढला होता. तसेच, ३ जानेवारी रोजी चांदीच्या किंमतीत तेवढीच घसरण झाली होती. दरम्यान, गुडरिटर्न्सनुसार एक किलो चांदीचा दर हा ७८,६०० रुपयांवर पोहोचली आहे. (Gold Rate Today)

Gold Silver Rate | नव वर्षाच्या सुरुवातीला असे आहेत सोने-चांदीचे दर

असा आहे १४ ते २४ कॅरेटचा भाव..?

काल सोन्याच्या किंमतींमध्ये वाढ झाली होती. तर, आज किंमतींमध्ये तितकीच घसरण झाली आहे. दरम्यान, आज प्रति कॅरेटनुसार असे आहेत सोन्याचे दर. इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार, २४ कॅरेट प्रति १० ग्रॅम सोन्याचे दर हे ६३.०१३ रुपये अस आहेत. तर, २३ कॅरेट प्रति १० ग्रॅम सोन्याची किंमत ही ६२,७६१ रुपये इतकी आहे. तसेच २२ कॅरेट प्रति १० ग्रॅम सोन्याचे दर हे ५७,७२० रुपये झाले असून, १८ कॅरेट प्रति १० ग्रॅम सोने हे ४७,२६० रुपयांवर पोहोचले आहे. तर, १४ कॅरेट सोने ३६,८६३ रुपये झाले आहे. तर एक किलो चांदीचा दर हा ७२,६९१ असा आहे. (Gold Rate Today)


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here