Gold Price | एकीकडे दसरा सण अवघ्या काही तासांवर येऊन ठेपला असून सोनं खरेदीची लगबग पाहायला मिळत आहे. परंतु दुसरीकडे इस्त्रायल-हमास युद्धाच्या पार्श्वभूमीवर सोन्याच्या दरात वाढ झाल्याचे चित्र दिसत असून गेल्या 36 तासात जळगाव म्हणजे सुवर्णनगरीत शुद्ध सोन्यात प्रति तोळा 1000 रुपयांची वाढ झाली आहे. तर दोन दिवसांपूर्वी 60,000 रुपये असलेलं सोने आज 61,000 हजार रुपयांवर पोहोचले आहे. त्यामुळे ग्राहकांचा चांगलाच हिरमोड झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
Shirdi | साईबाबांची शिर्डी सजली; चार दिवसीय साईबाबा पुण्यतिथी महोत्सवास भाविकांची जमली गर्दी
यंदा दसरा सण उत्साहात साजरा होणार असल्याची चिन्हे असून मात्र दुसरीकडे इस्त्रायल-हमास युद्धामुळे आंतरराष्ट्रीय गणितं कोलमडली आहेत. त्याचा परिणाम सोने-चांदिच्या दरावर देखील झाल्याचं पाहायला मिळतं आहे. एकीकडे दसऱ्याच्या सणामुळे सोन्याच्या मागणीत वाढ झालेली आहे आणि त्याचा परिणाम सोन्याचा दर वाढीत असल्याचं पाहायला मिळत आहे. जळगाव सुवर्णनगरीत गेल्या 36 तासात शुद्ध सोन्यात प्रति तोळा 1000 रुपयांची वाढ झालेली आहे. दोन दिवस पूर्वी 6000 रुपये असलेले सोनं आज 61000 हजार रुपये दरांवर पोहोचले आहे. उद्या दसरा सण असून जळगावसह संपूर्ण देशभरात अनेक ग्राहक सोने दरात करत असल्याने सोन्याची मागणी मोठ्या प्रमाणत वाढली असून उद्या सोन्याच्या दरात आणखी वाढ होण्याची शक्यता असल्याचे सोने विक्रेत्यांनी मत मांडलं आहे.
Petrol Diesel Price| सणासुदीला राज्य सरकारकडून गुड न्यूज… इंधन दर झाले कमी..?
सोने दरवाढीमुळे नागरिकांचा हिरमोड
महाराष्ट्रात एकीकडे दसऱ्याला सोनं लुटण्याची परंपरा आहे. त्याच पार्श्वभूमीवर अनेकजण नव्या गोष्टी खरेदी करून सुरूवात करत असतात. मग महत्त्वाची गोष्ट म्हणजे नवं सोनं खरेदी होय. त्यामुळे यंदा सोने खरेदीवर चांगलाच जोर पाहायला मिळतो आहे. परंतु ग्राहकांचे सोने खरेदीकडे कल वाढत असताना दुसरीकडे सोन्याच्या दरात वाढ झाल्याने नागरिकांचा हिरमोड झाल्याचं पाहायला मिळत आहे. सोन्याच्या दर आज 1000 रुपयांची वाढ झाल्याने थोडे बजेट बिघडलं असलं तरी उद्या दसऱ्यामुळे आणि काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या दिवाळीमुळे सोन्याचे दर वाढण्याची शक्यता असल्याने आम्ही आजच सोने खरेदी करत आहोत. असं सोने खरेदीदारांनी म्हटलं आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम