Crime News | शाळेतील शिपायाने 17 वर्षीय मुलीवर केला बलात्कार; नंतर गर्भवती केलं अन् अखेर…

0
12
Rape Case
Rape Case

Crime News | गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्रात महिलांच्या अत्याचार आणि बलात्काराच्या घटना वाढू लागलेल्या असताना आणखी एक मन हेलावून टाकणारी घटना समोर आलेली आहे. या घटनेमुळे मुली शाळेततरी सुरक्षित आहेत का? असा सवाल उपस्थित होतो आहे.

घटना नेमकी काय?

नवी मुंबईत 23 वर्षीय शाळेतील शिपायाने अल्पवयीन मुलीवर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. इतकंच नाही तर आरोपी तरुणाने मुलीला गर्भवती करत त्यानंतर मुलीला आत्महत्येला भाग पाडलं. पोलिसांनी आरोपी तरुणाला अटक केलेली आहे. पोलिसांनी आरोपीविरोधात पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला असून आरोपी हा शाळेत शिपाई म्हणून काम करतो. या अटकेनंतर आरोपीला कोर्टात हजर केलं असता 5 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज! ‘ही’ ट्रॅक्टर कंपनी लवकरच लॉन्च करणार CNG tractor

कोपरखैरणे पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, मुलीच्या आईने केलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी शुक्रवारी (दि. ०१) आरोपीला गोवंडीतून अटक केली. आरोपीविरोधात कलम 305 (अल्पवयीन मुलीला आत्महत्येसाठी भाग पाडणे), 376 (2) (वारंवार अत्याचार)आणि लहान मुलांना लैंगिक अत्याचारापासून संरक्षण देणाऱ्या पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

Gas Leakage | नाशकात सिलिंडर गळतीतून 20 बळी; यामागे नक्की कारण काय?

शाळेत शिपाई म्हणून काम करत असणाऱ्या आरोपीने 17 वर्षीय तरुणीशी कथितपणे मैत्री केली होती. त्यानंतर त्याने वारंवार तिच्यावर लैंगिक अत्याचार करत तरुणीला गर्भवती केलं. अखेर त्रासलेल्या मुलीने 28 नोव्हेंबरला घरात गळफास घेत आत्महत्या केली होती. यानंतर तपास करत पोलिसांनी आरोपीला अटक केली असून कोर्टात हजर केलं असता आरोपीला 5 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here