Gas Leakage | नाशिक शहर-जिल्ह्यात सिलिंडर गळतीमुळे अपघातांची संख्या वाढत आहे. हिवाळा सुरू झाल्याने या काळात गॅसचा वापर वाढत असतो. यामुळे साहजिकच अपघाताची शक्यता वाढते. गेल्या तीन वर्षांत 20 बळी गेलेल्या या सिलिंडर गळतीबाबत प्रत्येक कुटुंबात गांभीर्याने विचार करण्याची गरज आता भासत आहे. सध्या प्रत्येक कुटुंबात सिलिंडरचा वापर अनिवार्य झाला आहे. महिन्याला किमान 20 लाखांहून अधिक घरगुती सिलिंडरचा वापर होणाऱ्या जिल्ह्यात त्याचा वापर नित्याचा अविभाज्य भाग बनला आहे. सिलिंडरच्या वापरात गंभीरपणा कमी होत असल्याने हे अपघात वाढत आहेत.
Big News | गुणमोजणीचा फॉर्म्युला बदलला! दहावी-बारावीत आता टक्केवारी अन् श्रेणी नाही
सध्या प्रत्येक कुटुंबात सिलिंडर वापर होत असेल तर प्रत्येक सदस्याच्या सुरक्षेसाठी त्या कुटुंबात काळजी घेतली गेली पाहिजे. त्यासाठी ग्राहकांनी काळजी घेताना घरी सिलिंडर घेऊन येणाऱ्या डिलिव्हरी बॉयकडून ते घेताना सिलिंडरचे ‘सील’ काढून रेग्युलेटर लावून तपासणी करून घ्यायला हवी.
दर पाच वर्षांनी प्रत्येक कुटुंबाने शेगडीची आणि गॅस नळीची तपासणी करून घ्यायला पाहिजे. सिलिंडची सुरक्षा नळी ही वेळोवेळी बदलली पाहिजे. मात्र, हेच फारसं होताना दिसत नाही.
शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज! ‘ही’ ट्रॅक्टर कंपनी लवकरच लॉन्च करणार CNG tractor
प्रतिदिन ४० हजार सिलिंडर घरोघरी वापरले जातात
नाशिक शहर-जिल्ह्यात एकट्या भारत पेट्रोलियमचे दिवसाला 40 हजार सिलिंडर घरोघर वापरले जातात. एका महिन्याला 20 लाखांच्या आसपास सिलिंडरचा वापर होणाऱ्या शहर-जिल्ह्यात सिलिंडरच्या वाहतुकीसाठी 150 हून अधिक दुकानांतून सिलिंडर वाहतुकीच्या गाड्या अशी मोठी व्यवस्था आहे.
सिलिंडरच्या गोदामापासून तर वाहतूक आणि प्रत्येक घरातील वापरापर्यंत प्रत्येक टप्प्यात त्याची गळती हा कळीचा मुद्दा ठरलेला असतो. सामान्य नागरिकांमध्ये नियमित भाग म्हणून सिलिंडर वापराबाबत विशेष काळजी घेतली जात नाही. त्यातूनच हे गॅस गळतीचे अपघात वाढत असल्याचे या क्षेत्रातील जाणकारांचे म्हणणे आहे.
या गोष्टींची काळजी घ्या –
- घरी येणारे सिलिंडर तपासा
- झोपण्यापूर्वी रेग्युलेटर बंद करा
- पाच वर्षांनी एकदा तपासणी करा
- बाहेरगावी जाताना रेग्युलेटर बंद ठेवा
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम