Girish bapat: राजकारणातील ‘बापमाणूस’ काळाच्या पडद्याआड; नाशिक जिल्ह्याशी असेही संबंध

0
3

Girish Bapat death : राज्यातील राजकारणात आज वाईट दिवस उगवला असून, महाराष्ट्र दुःखाच्या सागरात बुडाला आहे. भाजपचे खासदार गिरीश बापट (Girish bapat deth) यांचं दीर्घ आजाराने निधन झाले. गेले काही दिवस त्यांच्यावर पुण्यातील दीनानाथ रुग्णालयात उपचार सुरु होते. आज सकाळ पासून त्यांची प्रकृती खालावली होती. (Girish bapat deth)

Iron Rich Food : जर तुम्हाला हिमोग्लोबिन वाढवायचे असेल तर आहारात करा हा समावेश

उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. वयाच्या 73 व्या वर्षी त्यांनी आज अखेरचा श्वास घेतला आहे. 1973 पासून ते राजकारणात सक्रिय होते. पुण्यात भाजपची यशस्वी वाटचाल करण्यात त्यांचा महत्वाचा वाटा आहे. राज्याच्या राजकारणातील बाप माणूस अशी गिरीश बापट यांची ओळख होती. त्यांच्या निधनाने भाजपमध्येच नव्हे तर राज्यातील राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. पुण्यातील कसबा मतदार संघात आणि इतर पुण्यात भाजप पक्ष वाढवण्यासाठी त्यांनी प्रचंड मेहनत केली होती. भाजपचा झेंडा कायम त्यांनी फडकवत ठेवला. (Girish bapat deth)

बापटांची राजकीय कारकीर्द…
• टेल्को कंपनीत 1973 ला कर्मचारी म्हणून कार्यरत.
• कामगार संघटनेच्या माध्यमातून राजकारणात प्रवेश केला.
• 1983 ला पुणे महापालिकेत नगरसेवक म्हणून निवडून आले.
• सलग तीनवेळा नगरसेवक म्हणून निवडून आले.
• 1993 साली कसबा पेठ विधानसभेच्या पोटनिवडणुकीत गिरीश बापट यांचा पराभव.
• राजकारणात मागे वळून पाहिलं नाही.
• 1995 पासून कसबा पेठ मतदारसंघात सलग पाचवेळा आमदार.
• राज्याच्या मंत्रिमंडळात अनेक खात्यांचे मंत्री तसेच पुण्याचे पालकमंत्री म्हणून काम.
• 2019 ला पुण्याचे खासदार म्हणून विक्रमी मताधिक्याने निवडून आले.

सर्व समावेशक नेतृत्व हरपले… (Girish bapat deth)
राज्याच्या राजकारणात ठराविक नेते हे सर्व्यांच्या आवडीचे असतात. गेल्या महिन्यात दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनामुळे पोटनिवडणुक झाली. यावेळी निवडणुकीत त्यांनी सक्रिय सहभाग घेतला. सुरुवातील प्रकृतीमुळे प्रचारात सक्रिय राहणार नाही असं त्यांनी सांगितलं मात्र पक्षनिष्ठा जपत ते पोटनिवणुकीसाठी ऑक्सिजन लावून आणि व्हिलचेअरवर भाजपच्या मेळाव्यासाठी पोहचले होते. तसेच आजारी असतानाही मतदानाचा हक्क बजावला होता. त्यानंतर गुढीपाडव्यानिमित्त कसबा गणपतीसमोर गिरीश बापटांच्या खासदार निधीतून करण्यात आलेल्या विकास कामांच्या उद्घाटनाला गिरीश बापट यांच्याकडून कॉंग्रेसचे विद्यमान आमदार रविंद्र धंगेकर आणि त्यांचे भाजपमधील प्रतिद्वंद्वी हेमंत रासने यांना आमंत्रित करण्यात आले होते. यामुळे सर्वसमावेशकपणा गिरीश बापट यांच्या राजकारणाचे वेगळेपण होते. चाळीस वर्षांच्या यशस्वी राजकीय कारकीर्दीचे रहस्य होते. (Girish bapat deth)

अनेक राजकीय नेत्यांशी मैत्रीचे धागे
गिरीश बापट यांचे स्वर्गीय विनायक मेटे असो किंवा इतर पक्षांतील अनेक नेत्यांशी त्यांचे चांगले. बापट आजारी असताना भाजपच्याच नाहीतर विरोधी पक्षाच्या नेत्यांनीही त्यांची भेट घेतली होती. त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यासोबतच इतर नेत्यांनीही भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली होती. त्यांच्या जाण्याने भाजपच मोठी पोकळी निर्माण झाली आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here