Skip to content

घोटी पोलिसांची धडाकेबाज कारवाई ; ३२ लाख ४६ हजारांचा गुटख्यासह मुद्देमाल जप्त


राम शिंदे
सर्वतीर्थ टाकेद : नाशिकचे नूतन पोलीस अधिक्षक शहाजी उमाप यांच्या आदेशान्वये जिल्ह्यातील अवैध धंद्याचे समुळ उच्चाटन, महामार्गावर होणारी गुटखा, बनावट दारु, अंमली पदार्थाची अवैध वाहतुक रोखण्यासाठी कारवाई करण्यात येत आहे.

पोलीस अधिक्षक यांना घोटी पोलीस स्टेशन हद्दीतुन अवैधरीत्या गुटख्याची वाहतुक होणार असल्याची गुप्त बातमी मिळाली. त्यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. अर्जुन भोसले यांना कार्यवाहीच्या सूचना दिल्या. त्यानुसार घोटीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप खेडकर, पोलीस कर्मचारी यांना मार्गदर्शन केले. शनिवारी रात्री पासुन घोटी टोलनाका परीसरात नाशिककडून मुंबईकडे जाणारा संशयित कंटेनर क्र. एमएच 12 एसएक्स 9843 याला पकडण्यासाठी सापळा रचला.

गुप्त बातमी प्रमाणे रविवारी पावनेतीनच्या सुमाराला वाहनाचा चालक राजु सुभाष पाटील, वय 31, रा. कुडुसगाव, ता. वाडा. जि. पालघर, सध्या राहणार कर्नाटक, सर्फराज फकिर पाशा, वय 32, रा. दुबुलगुडडी, ता. हुन्नाबाद, जि. बिदर, कर्नाटक यांना विचारपुस करुन कसुन चौकशी केली. त्यांनी कंटेनरमध्ये गुटखा असल्याचे कबुल केले आहे. घोटी पोलीस ठाण्यात कंटेनरमधील मालाची शहानिशा करता महाराष्ट्रात वाहतुक व विक्रीला प्रतिबंध असलेला 22 लाख 46 हजार 400 किमतीचा 4 k star सुगंधीत मसाला, तंबाखु ( गुटखा ) त्यात प्रमाणे वाहतुक करणारा कंटेनर किंमत 10 लाख असा एकुण 32 लाख 46 हजर 400 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. घोटी पोलिसांनी कलम 328, अन्न सुरक्षा व मानके कायदा 2006 चे कलमाप्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

वाहनाचा चालक राजु सुभाष पाटील, वय 31, रा. कुडुसगाव, ता. वाडा. जि. पालघर, सध्या राहणार कर्नाटक, सर्फराज फकिर पाशा, वय 32, रा. दुबुलगुडडी, ता. हुन्नाबाद, जि. बिदर, कर्नाटक या दोघांना अटक करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस अधिक्षक शहाजी उमाप यांचे मार्गदर्शनाखाली घोटीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप खेडकर यांनी सुरु केला आहे. ह्या कामगिरीमध्ये उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. अर्जुन भोसले, सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप खेडकर, श्रध्दा गंधास, पोना झाल्टे, पोना कोठुळे, पोशि गायकवाड, पोहवा शिंदे, पोना करंडे सहभागी होते. महामार्ग व इतर मार्गावरुन गुटखा, अंमली पदार्थाची वाहतुक होत असल्यास तात्काळ घोटी पोलीस स्टेशन किंवा नियंत्रण कक्ष नाशिक ग्रामीण येथे कळवावे. माहिती देणाऱ्याचे नाव गुप्त ठेवण्यात येईल असे आवाहन पोलिसांनी केले आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!