Gautam Adani यांची रेकॉर्डब्रेक कमाई; 24 तासात संपत्तीत 1,91,62,33,50,000 रुपयांची भर

0
24
Gautam Adani
Gautam Adani

Gautam Adani | गौतम अदानी उद्योग समूहाचे संस्थापक उद्योगपती गौतम अदानी (Gautam Adani) यांच्या संपत्तीत गेल्या काही दिवसात मोठी भर पडली असून जगातील श्रीमंत व्यक्तींच्या यादीत गौतम अदानी गेल्या 24 तासात सर्वाधिक कमाई करणारे उद्योगपती ठरलेले आहेत. गौतम अदानी समुहाच्या नेटवर्थमध्ये (Gautam Adani) एका दिवसात तब्बल 12.3 अरब डॉलर म्हणजे  1,91,62,33,50,000 रुपयांची भर पडलेली आहे. एका दिवसात सर्वाधिक कमाई करणारे नंबर वन अरबपती बनलेले आहेत.

Jalgaon | जळगावच्या शिव महापुराण कथेत महिला चोरांचा सुळसुळाट

गौतम अदानी यांची संपत्ती

ब्लूमबर्ग बिलेनियर्स इंडेक्सने जारी केलेल्या आकडेवारीनुसार सोमवारी (दि. ०४) गौतम अदानी यांनी एकाद दिवसात 4 अरब डॉलरची कमाई केली असून मंगळवारी (दि. ०५) मोठी झेप घेत अवघ्या 24 तासात 12.3 अरब डॉलरची कमाई केली आहे. एका दिवसातील कमाईच्या आकडेवारीमध्ये गौतम अदानी यांनी एलन मस्कपासून बर्नार्ड अर्नाल्टपर्यंतच्या कमाईपेक्षा Top-3 Billionaires कितीतरी पटीने अधिक आहे.

एलन मस्क (Elon Musk) यांची संपत्ती  2.25 अरब डॉलर, जेफ बेजॉस (Jeff Bezos) यांची संपत्ती 1.94 अरब डॉलर आणि बर्नार्ड अर्नाल्ट (Bernard Arnault) यांची संपत्ती 2.16 अरब डॉलर वाढलेली आहे. Gautam Adani

Winter Session | हिवाळी अधिवेशनावर धडकणार १०० मोर्चे; सरकारला घाम फुटणार?

श्रीमंत व्यक्तीच्या यादीत पंधराव्या स्थानावर

एका दिवसात केलेल्या या विक्रमी कमाईमुळे गौतम अदानी यांनी जगातील श्रीमंत व्यक्तींच्या यादीत मोठी झेप घेतलेली असून श्रीमंताच्या यादीत अदानी यांनी 4 स्थानांची बढत घेतलेली आहे. 20 व्या स्थानावरुन ते 16 व्या स्थानावर पोहोचले होते मात्र संपत्तीत आणखी 82.5 अरब डॉलरची भर पडल्याने गौतम अदानी थेट 15 व्या स्थानावर पोहोचलेले आहेत. (Gautam Adani)

अदानी समूहाचे शेअर वाढले

Gautam Adani यांच्या संपत्ती वाढीमागे त्यांच्या कंपनीच्या शेअरला मिळालेली तेजी कारणीभूत ठरली असून गेल्या तीन दिवसात Adani Group चे शेअर रॉकेटच्या वेगाने वरती गेलेले आहेत. Adani Total Gas चा शेअर 18.66 टक्के आणि Adani Green Energy Share 14.1 टक्के तेजीत आहेत तसेच याशिवाय अदानी पोर्ट (Adani Port), अदानी पावर (Adani Power), अदानी विल्‍मर (Adani Wilmar) यांना सुद्धा बाजारात मोठी मागणी आहे.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here