Skip to content

सिटीलिंक मधून दिव्यांगांना आता प्रवास मोफत !


द पॉईंट नाऊ: महापालिका हद्दीतील चाळीस टक्के किंवा त्यापेक्षा अधिक अपंग असलेल्या दिव्यांगांना सिटी लिंकमध्ये मोफत प्रवास करता येणार आहे. येत्या १ नोव्हेंबरपासून ही सवलत उपलब्ध होणार आहे. इतकेच निव्हे, तर ६५ टक्के किंवा त्यापेक्षा अधिक दिव्यांग असेल, तर त्याच्या बरोबरील सहप्रवाशाला ५० टक्के भाडे सवलत देण्यात येणार आहे.

सिटी लिंकच्या वतीने बुधवारी (दि. १२) या संदर्भात घोषणा करण्यात आली आहे. सर्व सामन्य प्रवाशांसाठी विविध योजना राबविल्या जात आहेत. मात्र, आता दिव्यांगांसाठी मोफत प्रवासाची. योजना घोषित करण्यात आली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी ४० टक्के किंवा ४० टक्क्यांपेक्षा जास्त दिव्यांग असलेल्या प्रवाशांना सिटीलिंकच्या अधिकृत पास केंद्रावरून सिटी लिंकचा मोफत प्रवासाचा पास काढावा लागणार आहे. पास काढण्यासाठी प्रवाशाचा फोटो, रहिवासी पुरावा, आधार कार्ड, तसेच ४० टक्के दिव्यांग असल्याचे शासकीय प्रमाणपत्र यांची मूळ प्रत, तसेच झेरॉक्स कॉपी आवश्यक असेल, तसेच पाससाठी ४० रुपये इतके शुल्क आकारले जाणार आहे.

 

पास स्कॅन करणे बंधनकारक

नाशिक महानगरपालिका हद्दीत राहत असलेल्या दिव्यांग प्रवाशांनाच मोफत प्रवासाची सवलत असून, त्यासाठी १४ ऑक्टोबरपासून सिटी लिंक पास केंद्रावरून सदर मोफत पास काढता येईल, तर १ नोव्हेंबरपासून सदर पासचा वापर करता येणार. प्रवास करताना प्रत्येक वेळी हा मोफत पास वाहकाकडून स्कॅन करणे बंधनकारक आहे.

 

….तर भाड्यात ५० टक्के सवलत 

 

६५ टक्के किंवा ६५ टक्के पेक्षा जास्त दिव्यांग असल्यास व मोफत प्रवासाचा पास असल्यास सोबत असलेल्या प्रवाशालाही तिकिटामध्ये ५० टक्के सवलत देण्यात येणार आहे. मात्र, त्यासाठी पास काढतेवेळी सिटी लिंक सीस्टिममध्ये ६५ टक्क्यांपेक्षा जास्त दिव्यांग असल्याचे अपलोड केलेले हवे, अन्यथा मोफत पास असलेल्या प्रवाशांसोबत असलेल्या कुणालाही तिकिटामध्ये सवलत मिळणार नाही, असे कंपनीने स्पष्ट केले आहे.

 

 


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!