राम शिंदे
सर्वतीर्थ टाकेद : महाराष्ट्रातील दुष्काळी भागात आयुष्य वेचत इंडो क्षेत्र विकास कार्यक्रमातुन ज्यांनी काम केले प्रख्यात पानलोटचे खरे पितामह कृषिभूषण देवमाणूस फादर हर्मन बाखर यांच्या पुण्य स्मरण दिनानिमित्त इगतपुरी तालुक्यातील ग्रामपंचायत भरवीर बु येथील भंडारदरावाडीत सकाळी सर्व ग्रामपंचायत पदाधिकारी सर्व ग्रामस्थ महिला माता बघिणी यांच्या समवेत वॉटर संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने श्रमदानातून वनराई बंधारे बांधण्यात आले.
12 ऑक्टोंबर 2022 रोजी वॉटरशेड ऑर्गनायझेशन ट्रस्ट संस्थेचे संस्थापक मा. फादर हर्मन बाखर यांची जयंती श्रमदान करून वनराई बंधारा बांधत उत्साहात साजरी करण्यात आली. वॉटरशेड ऑर्गनायझेशन ट्रस्ट,अहमदनगर संस्थेचे विभागीय कार्यालय प्रमुख शरद भनगडे ,अकाउंट डिपार्टमेंट विलास शिंदे, एच आर डिपार्टमेंट दत्ता चव्हाण, मानव संसद विभाग सुजित केदारी, विभाग प्रमुख बीबीशन उघडे, टाकेद विभाग सोमनाथ गोसावी, साहेबराव फड, वाशिंद विभागाचे इंजिनिअर ज्ञानेश्वर आडे, उमेश तंबूड, महिला विभागीय प्रमुख ज्योती महाजन,लीना मॅडम, सरपंच, संगीता अरुण घोरपडे, ग्रामविकास समिती अध्यक्ष राजाराम घोरपडे, सचिव देवराम फोडसे, सदस्य कमलाकर सांभरे, रतन घोरपडे, जेष्ठ नागरिक साहेबराव झनकर तसेच गावातील गावकरी महिला पुरुष सरपंच तर्फे भंडारदरावाडी गावामध्ये वनराई बंधारा बांधण्यात आला.
गाव-भंडारदरावाडी, तालुका-इगतपुरी, जिल्हा-नाशिक
उपक्रम – वनराई बंधारा (18 मीटर लांबी )
उपस्थित गावकरी -पुरुष-130, महिला-16, एकूण-146
होणारा पाणीसाठा- 1134000 लिटर.
या कार्यक्रमा प्रसंगी भरवीर बु भंडारदरावाडीतील बहुसंख्य ग्रामस्थांनी पाणी आडवा पाणी जिरवा या संकल्पनेतून वनराई बंधारे बांधण्याचा निश्चय केला. वॉटर संस्थेच्या वतीने गावातील सर्व ग्रामस्थांना पाणलोट संदर्भात मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी सरपंच संगीता अरुण घोरपडे,वॉटर शेड ऑर्गनायझेशन ट्रस्ट अहमदनगर संस्थेचे विभागीय कार्यालय प्रमुख शरद भनगडे सर अकाउंट डिपार्टमेंट विलास शिंदे, एच आर डिपार्टमेंट दत्ता चव्हाण ,मानव संसद विभाग सुजित केदारी , विभाग प्रमुख बीबीशन उघडे, टाकेद विभाग सोमनाथ गोसावी ,साहेबराव फड , वाशिंद विभागाचे उमेश तंबूळ, महिला विभागीय प्रमुख ज्योती महाजन, लीना मॅडम, सामाजिक कार्यकर्ते राम शिंदे, ग्रामविकास समिती अध्यक्ष राजाराम घोरपडे, सचिव देवराम फोडसे, सदस्य कमलाकर सांभरे, रतन घोरपडे, अनिता गोडे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे गटनेते अशोक गाढवे, सागर गाढवे, किरण भाऊ साबळे आदींसह सर्व ग्रामस्थ उपस्थित होते.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम