Election Result | नाशिक भाजपा कार्यालयात ढोलताशांवर नाचले पदाधिकारी; विजयाचा जल्लोष 

0
14

Election Result | पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला आहे. यात प्रामुख्याने राजस्थान, मध्यप्रदेश आणि छत्तीसगढमध्ये भाजपाने बहुमत मिळविलेले आहे. या विजयाचा आनंदोत्सव एन. डी. पटेल रोडवरील भाजपा कार्यालयात साजरा करण्यात आला असून यावेळी ढोलताशाच्या तालावर पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी थिरकत जल्लोष केला. त्यानंतर पेढयांचे वाटप करत आनंदोत्सव साजरा करण्यात आला. (Election Result)

Gas Leakage | नाशकात सिलिंडर गळतीतून 20 बळी; यामागे नक्की कारण काय?

राजस्थान, छत्तीसगढमध्ये भाजपने काँग्रेसची सत्ता उलथवून लावली तर मध्यप्रदेशमध्ये आपली सत्ता कायम राखत भाजपा सत्तेच्या जवळ पोहोचली आहे. या तीनही राज्यांमध्ये गेल्या दोन महिन्यांपासून विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू होती. मध्यप्रदेशात गेल्या महिन्यात 25 तर, राजस्थान, छत्तीसगड आणि तेलंगणामध्ये गेल्या 1 डिसेंबर रोजी मतदान झालेले होते. राजस्थान, छत्तीसगढ आणि मध्यप्रदेश या उत्तर भारतातील मोठ्या राज्यांमध्ये भाजपाचे मोठा विजय मिळविलेला आहे.

 

त्या विजयाचा जल्लोष करण्यासाठी नाशिकच्या एन.डी. पटेल रोडवरील शहर भाजपा कार्यालयात पदाधिकारी आणि कार्यकर्ते जमा झाले होते. यावेळी ढोलताशांच्या आवाजात पदाधिकारी-कार्यकर्त्यांनी विजयी जल्लोष साजरा केला.

Crime News | शाळेतील शिपायाने 17 वर्षीय मुलीवर केला बलात्कार; नंतर गर्भवती केलं अन् अखेर…

तसेच यावेळी मिठाई आणि पेढ्यांचे वाटप करीत आनंदोत्सव साजरा केला. यावेळी भाजपाचे प्रदेश प्रवक्ते लक्ष्मण सावजी, शहराध्यक्ष प्रशांत जाधव, विजय साने, माजी महापौर सतिश कुलकर्णी, माजी शहराध्यक्ष गिरीश पालवे, आमदार सीमा हिरे, महेश हिरे, ॲड. शाम बडोदे, अविनाश पाटील, महिला आघाडीच्या प्रदेश चिटणीस माधुरी पालवे-पडार, अविनाश पाटील, धनंजय माने, राकेश डोमसे, स्मीता बोडके, अमित घुगे, शाहीन मिर्झा, गुलाब सईद, युवा मोर्चा अध्यक्ष सागर शेलार, अमोल पाटील, प्रदेश प्रवक्ते गोविंद बोरसे, अरुण शेंदुर्णीकर, ॲड. श्रीधर व्यवहारे, हेमंत शुक्ल, राजेद्र महाले, अजिंक्य साने, सोनाली ठाकरे, प्रकाश जडे, अमोल गांगुर्डे आदींसह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. (Election Result)


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here