Skip to content

साहेब परत या…..! ; शिवसैनकांना अश्रू अनावर


मुंबई : राज्यात आज राजकारण ढवळून निघाले असून शिंदेंच्या बंडाने शिवसैनिक व्यथित झाले आहेत. आज मुंबईत अनेक ठिकाणी शिवसैनिकांनी घोषणाबाजी केली मात्र यावेळी अनेकांना अश्रू अनावर झाले असून प्रत्येक शिवसैनिकाला धक्का बसल्याचे चित्र आहे.

या सर्व घडामोडींमुळे शिवसैनिक व्यथित झाले असून त्यांना भाजपच्या या वागण्याचा अती प्रचंड त्रास झाला असून सैनिक पेटून उठला आहे. अनेक ठिकाणी महिलांचे अश्रू अनावर झाले आहेत. मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांना देखील अश्रू अनावर झाले असून बाळासाहेबांच्या स्मुर्तीस्थळी त्या ढसा ढसा रडल्याने सैनिकांना अश्रू अनावर झाले आहेत. भाजपाच्या खेळीत अडकू नका तुम्ही घरी परत या अशी हाकच पेडणेकर यांनी दिली आहे.

सेना भवन बाहेर सैनिकांनी घोषणाबाजी केली तेव्हा उद्धव ठाकरे संकटात असल्याने महिला सैनिकांनी अश्रू अनावर झाले. महिलांनी चिंता व्यक्त करत कितीही नेते गेले तरी आम्ही सेनेसोबत असल्याचे सैनिकांनी म्हटले आहे. यामुळे शिंदे परतणार का हे बघण महत्वाचे आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!