Eknath Shinde | ‘पीएमएलए’ कायद्याअंतर्गत मुख्यमंत्र्यांना अटक करा..?

0
11
Eknath Shinde
Eknath Shinde

Eknath Shinde | राज्याचे राजकारण हे सध्या अनेक गोष्टींमुळे तापले आहे. यात सध्या चर्चेचा विषय म्हणजे कल्याणच्या उल्हासनगरमध्ये घडलेला गोळीबाराचा प्रकार. भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी शिंदे गटाचे महानगरप्रमुख तथा माजी नगरसेवक महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला. या प्रकारणी आमदार गणपत गायकवाड हे पोलिसांच्या ताब्यात आहेत. मात्र, यामुळे राज्याचे राजकारण हे ढवळून निघाले असून, आ. गणपत गायकवाड यांनी थेट मुख्यमंत्री शिंदेंवर ‘मुख्यमंत्री राज्यात गुन्हेगारीचे राज्य घडवत असल्याचे’ आरोप केले होते. दरम्यान, या प्रकरणी आता ठाकरे गटाचे मुखपत्र असलेल्या सामनातून संजय राऊत यांनीही मुख्यमंत्र्यांवर शाब्दिक आसुढ ओढले आहे. तसेच राज्यात गुंडांचे राज्य असून, एकनाथ शिंदे यांची चौकशी करण्यात यावी व त्यांना अटक करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे. (Eknath Shinde)

Ajit Pawar | अजित पवारांनी हद्दच पार केली..; काकांच्याच मरणाची वाट पाहता..?

Eknath Shinde | राऊत काय म्हणाले..?

सामनाच्या अग्रलेखात संजय राऊत म्हणाले आहेत की,”भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी एक महत्त्वाचा कबुलीजबाब दिला आहे. एकनाथ शिंदेंकडे माझे कोट्यवधी रुपये पडलेले आहेत. गायकवाडांचा कबुलीजबाब हाच एफआयआर समजून हे ‘मनी लॉण्डरिंग’चे प्रकरण असून, त्या दिशेने तपास करण्यात यावा. ईडीने गणपत गायकवाड यांचे जबाब घेऊन हेमंत सोरेनप्रमाणे एकनाथ शिंदेंवरही त्वरित कठोर कारवाई केली पाहिजे. हे कोट्यवधी रुपये काही सरळ मार्गाने आलेले नसून, गुन्हेगारीच्या मार्गाने आलेला पैसा हा मुख्यमंत्र्यांनी स्वीकारला आहे. हे अगदी सरळ ‘मनी लॉण्डरिंग’चे प्रकरण असून, त्यासाठी त्यांना ‘पीएमएलए’ कायद्याअंतर्गत अटक व्हायला हवी. (Eknath Shinde)

महाराष्ट्रात आता पोलीस ठाणीही सुरक्षित नाही. कायदा व सुव्यवस्था ही गुंडांच्या अड्ड्यांवरचा कचरा काढत आहे. पोलीस स्टेशनवरच हल्ले करणे, पोलीस प्रमुख, जिल्हाधिकाऱ्यांच्या हत्या घडवून आणणे हे मिर्झापुरी राजकारण उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये अनेकदा घडत असते. पण आता हे प्रकार महाराष्ट्रातही घडू लागले आणि या भयानक गुन्हेगारी संघर्षाचे सूत्रधार हे स्वतः राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आहेत. शिंदे हे जर मुख्यमंत्री असतील तर राज्यात फक्त गुन्हेगारांचीच पैदास होईल, असे आरोप करत भाजपचे ज्येष्ठ आमदार गणपत गायकवाड हे तुरुंगात गेलेत.

Doctors Strike | सरकारकडून आश्वासनांचे गाजर; निवासी डॉक्टर संपावर

संस्कार भारती’ तोंड उघडायला तयार नाही

उल्हासनगरमधील पोलीस स्टेशनमध्ये आमदार गणपत गायकवाड यांनी शिंदे गँगचा सदस्य असलेल्या महेश गायकवाडवर गोळीबार केला. या गोळीबारामध्ये शिंदे गँगचे दोन सदस्य जखमीही झालेत. स्वतः मुख्यमंत्री हे आपल्या गँगच्या जखमींना पाहण्यासाठी इस्पितळात गेले आणि हळहळले. मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यातले हे ‘गँगवॉर’ संपूर्ण देशाने पाहिले आहे. त्यामुळे ते देशाचे गृहमंत्री अमित शहा आणि पंतप्रधान मोदी यांनीही पाहिलेच असणार. मग इतक्या भयंकर घटनेवर त्यांची अद्यापही काही प्रतिक्रिया नाही. बिगर भाजपशासित राज्यांमध्ये मुंगी पादली तरी या मंडळींची प्रतिक्रिया येत असते, पण महाराष्ट्रात शहा-मोदी यांनी नेमलेल्या या मुख्यमंत्र्यांच्या नावाने गुंडगिरी, रक्तपात सुरू आहे. मात्र, त्यावर हे ‘संस्कार भारती’ तोंड उघडायलाही तयार नाहीत. (Eknath Shinde)


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here