सोमनाथ जगताप – प्रतिनिधी : देवळा | ‘देवळा तालुका शेतकी सहकारी संघा’च्या संचालक पदी जितेंद्र आव्हाड युवा मंचचे जिल्हाध्यक्ष सचिन सूर्यवंशी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. माजी आमदार कै. शांताराम आहेर यांनी स्थापन केलेल्या देवळा तालुका शेतकरी सहकारी संघामार्फत सभासद आणि इतर शेतकऱ्यांसाठी रासायनिक खतांची विक्री, मका खरेदी केली जाते. तसेच वेळोवेळी शेतकऱ्यांना शेती तज्ञांच्या माध्यमातून मार्गदर्शन करण्यात येते. काही महिन्यांपूर्वी या संघाची पंचवार्षिक निवडणूक संघाचे माजी चेअरमन योगेश आहेर यांच्या नेतृत्वाखाली बिनविरोध पार पाडली.(Deola)
Doctors Strike | सरकारकडून आश्वासनांचे गाजर; निवासी डॉक्टर संपावर
संचालक मंडळाला सहकार कायद्यानुसार सहकारी संस्थांमध्ये शेतकरी प्रतिनिधी म्हणून नेमणूक करण्यात येते. त्यानुसार सचिन सूर्यवंशी यांची संचालक पदी नियुक्ती करण्यात आली. यावेळी चेअरमन कैलास देवरे, व्हा. चेअरमन अमोल आहेर, संचालक व बाजार समितीचे सभापती योगेश आहेर, माजी संचालक जितेंद्र आहेर, चिंतामण आहेर, संजय गायकवाड, राजेंद्र ब्राह्मणकार, हंसराज जाधव, काशिनाथ पवार, नानाजी आहेर, रवींद्र जाधव, साहेबराव सोनजे, सुलभा आहेर, अर्चना आहेर, सुवर्णा देवरे, अतुल आहेर, विनोद देवरे, चेतन गुंजाळ,सचिव गोरख आहेर आदी उपस्थित होते. नवनिर्वाचित पदाधिकरी सचिन सूर्यवंशी यांचे सर्व स्तरावरून अभिनंदन करण्यात येत आहे.(Deola)
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम