Eknath Khadse | गेल्या अनेक दिवसांपासून एकनाथ खडसे हे आपल्या स्वगृही परतणार अशा चर्चा सुरू होत्या. दरम्यान, यावर त्यांनी स्वतः खुलासा केला होता. मात्र, त्यांच्या पक्ष प्रवेशाबाबत भाजपच्या काही ज्येष्ठ नेते उदासीन असून, त्यामुळे त्यांचा पक्ष प्रवेश रखडला आहे. लोकसभा निवडणूक झाल्यानंतर एकनाथ खडसे यांचा भाजप प्रवेश होण्याची शक्यता आहे.
नुकतच काही दिवसांपूर्वी एकनाथ खडसे यांनी आपला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या (NCP Sharad Pawar Faction) सदस्यत्वाचाही राजीनामा दिला होता. दरम्यान, आता स्वतः एकनाथ खडसे हे त्यांच्या सुनबाई आणि रावेर लोकसभा मतदारसंघाच्या (Raver Lok Sabha Constituency) विद्यमान खासदार तथा भाजप उमेदवार रक्षा खडसे (Raksha Khadse) यांच्या प्रचारासाठी मैदानात उतरले आहेत. यासाठी त्यांनी आपल्या इतर पक्षातील समर्थकांसोबत बैठका घेतल्या आहेत. (Eknath Khadse)
Eknath Khadse | ‘या’ तीन नेत्यांमुळे रखडला नाथाभाऊंचा भाजप प्रवेश..?
Eknath Khadse | रक्षा खडसेंना समर्थकांचा पाठिंबा
एकनाथ खडसे यांचा अजून पक्ष प्रवेश झालेला नसला तरीही त्यांनी रावेर लोकसभा मतदारसंघाच्या भाजप उमेदवार रक्षा खडसे यांच्या प्रचारासाठी त्यांच्या इतर पक्षातील समर्थकांच्या रावेर, सावदा आणि फैजपूर येथे काही महत्त्वाच्या बैठका घेतल्या. मतदार संघातील मतदानाची टक्केवारी वाढणे आणि रक्षा खडसेंना एकनाथ खडसे समर्थकांचा पाठिंबा देण्याचा प्रयत्न एकनाथ खडसे यांच्याकडून सुरू आहे. (Eknath Khadse)
Eknath Khadse | खडसेंच्या लेकीचा मोठा निर्णय; वडिलांचा फोटोच हटवला..?
आता कोणाचाही प्रचार करू शकतो
दरम्यान, त्यांनी थेट रक्षा खडसेंच्या प्रचारात सहभागी न होता आपल्या समर्थकांसोबत त्यांनी सावदा आणि फैजपूर येथे बैठका घेतल्या. या मेळाव्यात त्यांनी मतदारांना रक्षा खडसे यांना निवडून देण्याचे आवाहन केले. राष्ट्रवादीचा आपण राजीनामा दिल्यामुळे आता आपण कोणाचाही प्रचार करू शकतो, असे स्पष्टीकरणही एकनाथ खडसे यांनी यावेळी दिले. तसेच, जेव्हा शरद पवार हे माझ्याकडून आमदारकीचा राजीनामा मागतील. तेव्हाच मी माझ्या आमदारकीचा राजीनामा देईल, असेही त्यांनी सांगितले. त्यामुळे आता एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांच्या पाठिंब्याने रावेर लोकसभा मतदारसंघात रक्षा खडसे (Raksha Khadse) यांची ताकद वाढणार आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम