Eknath Khadse | गेल्या अनेक दिवसांपासून एकनाथ खडसे यांच्या भाजप पक्षप्रवेशाची चर्चा सुरू होती. दरम्यान, अखेर याबाबत स्वतः एकनाथ खडसेंनीच खुलासा केला होता. मात्र अजूनही त्यांचा भाजप प्रवेश झाला नसून, तो रखडण्यामागची कारणं समोर आली आहे. एकनाथ खडसेंची घरवापसी कोणामुळे आणि का रखडली याबाबत मोठी माहिती समोर आली आहे. काही दिवसांपूर्वी एकनाथ खडसे यांनी दिल्लीत जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी नड्डा (J P Nadda) यांची भेट घेत त्यांच्यासोबत पक्ष प्रवेशाबाबत चर्चा केली होती.(Eknath Khadse)
त्यानंतर ते जळगावमध्ये आले आणि त्यांनी तेथे पत्रकार परिषद घेत आपण भाजपमध्ये जाणार असल्याची घोषणा केली होती. मात्र, या घटनेला आता कित्येक दिवस उलटले. मात्र, तरीही खडसेंचा पक्ष प्रवेश रखडलेलाच आहे. आपण लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार आहोत आणि कोणत्याही अटीशर्ती शिवाय प्रवेश करणार असल्याचे तीयांनी यावेळी जाहीर केले होते. (Eknath Khadse)
खडसेंवर राज्यातील तीन वरिष्ठ नेते नाराज?
दरम्यान, एकनाथ खडसेंचा भाजप प्रवेश अद्याप का झाला नाही. याबाबतची एक मोठी माहिती समोर आली असून, यानुसार राज्यातील तीन प्रमुख नेत्यांमुळे खडसेंचा पक्ष प्रवेश रखडल्याची माहिती समोर आली आहे. भाजपच्या दिल्लीतील प्रमुख नेत्यांकडून एकनाथ खडसे यांना राज्यात कार्यक्रम घेऊन पक्षात सामील करून घ्या, असे सांगण्यात आले आहे. मात्र राज्यातील भाजपचे तीन वरिष्ठ नेते हे याबाबत उदासीन असल्याची माहिती समोर आली आहे. (Eknath Khadse)
Eknath Khadse | खडसेंच्या लेकीचा मोठा निर्णय; वडिलांचा फोटोच हटवला..?
अधिकृतरित्या पक्षाने आम्हाला कळवले नाही..
याबाबत काही दिवसांपूर्वी मध्यमांकडून देवेंद्र फडणवीस यांना विचारणा केली असता, “भाजपमध्ये पंतप्रधान मोदी यांच्यावर विश्वास ठेऊन कोणीही पक्षात येत असेल. तर त्यांना कोणाचाही विरोध असण्याचे काही कारण नाहीये. याबाबत अधिकृतरित्या अद्याप पक्षाने आम्हाला कळवलेले नसून ज्यावेळी पक्ष आम्हाला काही कळवेल त्यावेळी आम्ही त्यांचे नक्की स्वागतच करू, असे म्हटले होते. (Eknath Khadse)
Eknath Khadse | एकनाथजी हे खूप मोठे नेते
तर, मंत्री गिरीश महाजन म्हणाले की,”एकनाथजी खडसे हे खूप मोठे नेते आहेत. त्यामुळे त्यांचा पक्षप्रवेश हा माझ्यासारख्या एखाद्या छोट्या माणसाचं काम नाही. त्यांचा पक्ष प्रवेश असा खालती मुंबईत होणार नाही. आपला पक्षप्रवेश हा दिल्लीत होणार असून, माझ्या वर ओळखी आहेत, असे ते म्हणतात. त्यामुळे ते एक फार मोठे नेते आहेत.” अशी खरमरीत प्रतिक्रिया गिरीश महाजनांनी दिली होती. त्यामुळे हे दोन्ही नेते एकनाथ खडसे यांच्या पक्षप्रवेशावर फारकाही खुश नसून, त्यामुळे हे नेते एकनाथ खडसेंच्या पक्षप्रवेशाबाबत उदासीन असल्याची चर्चा आहे. (Eknath Khadse)
Devendra Fadanvis | नाथाभाऊंच्या घरवापसीवर फडणवीस, महाजन नाराज..?
खडसेंचा प्रवेश निवडणुकीनंतर?
दरम्यान, ऐन निवडणूकांच्या काळात खडसेंना पक्षात घेतले तर, स्थानिक आणि राज्य पातळीवरील पक्षांतर्गतवाद निर्माण होऊ शकतात. त्यामुळे निवडणुकीनंतर त्यांचा पक्ष प्रवेश घेऊ, अशी राज्यातील काही नेत्यांची भूमिका आहे. त्यामुळे खडसेंचा प्रवेश हा लोकसभा निवडणूकीनंतर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता खडसेंचा हा रखडलेला भाजप प्रवेश कधी होणार? हे पहावे लागणार आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम