शहरात सीएसआर निधीतून उभारणार १५ इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशन्स

0
11

नाशिक : प्रदूषण व इंधनमुक्त नाशिक शहर होण्याच्या दृष्टीने सुरू असलेल्या प्रयत्नांना आता यश येत असून लवकरच नाशिक महापालिका शहरातील १५ ठिकाणी ई-चार्जिंग स्टेशन्स उभारणार आहे.

त्यासाठी दिल्ली येथील यूएनडीपी कंपनीने शहरातील हे ई-चार्जिंग स्टेशन बसवण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याची तयारी दर्शवली असल्याची माहिती खा. हेमंत गोडसे यांनी दिली आहे. ह्या चार्जिंग स्टेशन्सची उभारणी झाल्यास शहरात इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढून इंधनाच्या वापरात मोठी कपात हाेईल, असा कयास आहे.

नाशिक आता स्मार्ट शहर म्हणून उदयास येणार असल्याचा गाजावाजा सध्या सुरू आहे. या स्मार्ट सिटीअंतर्गत शहरात विविध विकासकामे सुरू आहेत. तरी शहर प्रदूषणमुक्त व्हावे यासाठीही उपाययोजना करण्यात याव्यात, अशी मागणी शहरातील विविध संस्थांच्या पदाधिकार्‍यांकडून खा. गोडसेंकडे सतत होत होती. खा. गोडसे यांनी त्याची दखल घेत यूएनडीपी कंपनीशी संपर्क साधून शहरात चार्जिंग स्टेशन उभारण्याकामी कंपनीच्या सामाजिक दायित्व (सीएसआर) निधीतून हा निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती. ही मागणी मान्य केल्याने शहरात चार्जिंग स्टेशन उभारण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याची तयारी कंपनीने दर्शवली आहे.

याविषयीचे पत्र यूएनडीपी कंपनीने मागील आठवड्यात महापालिकेला पाठविले होते. या पत्राची दखल घेत मनपाने १५ ई-चार्जिंग स्टेशनच्या स्थळांचा प्रस्ताव बुधवारी कंपनीला पाठविला आहे.

येथे असणार हे ई-चार्जिंग स्टेशन्स :

राजीव गांधी भवन मुख्यालय, महापालिकेच्या पूर्व व पश्चिम, नवीन नाशिक, नाशिकरोड, सातपूर, पंचवटी विभागीय कार्यालये, बिटको हॉस्पिटल, झाकीर हुसेन हॉस्पिटल, महाकवी कालिदास कलामंदिरासमोरील पार्किंग, इच्छामणी मंगल कार्यालय, बोधलेनगर, लेखानगर, गंगापूररोडवरील प्रमोद महाजन उद्यान, कृषीनगर जॉगिंग ट्रॅक या ठिकाणी ही ई-चार्जिंग स्टेशन्स उभारली जाणार आहेत.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here