तब्बल २५०० कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त, मुंबई पोलिसांनी केले आठ गुन्हेगारांवर आरोपपत्र दाखल

0
49

द पॉईंट नाऊ: मुंबई पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी सेलने (ANC) शुक्रवारी सुमारे २,५०० कोटी रुपयांच्या ड्रग्ज प्रकरणात आठ आरोपींविरुद्ध आरोपपत्र दाखल केले असून. सर्व आरोपी सध्या एनडीपीएस कायद्यान्वये न्यायालयीन कोठडीत आहेत. आरोपींविरुद्ध नार्कोटिक ड्रग्स अँड सायकोट्रॉपिक सबस्टन्सेस ॲक्ट (एनडीपीएस ॲक्ट ) अंतर्गत विशेष न्यायालयात ४,८१८ पानांचे आरोपपत्र दाखल करण्यात आले असल्याचे विभागीय अधिकाऱ्याने सांगितले.

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘म्याव म्याव’ म्हणून ओळखल्या जाणार्‍या सिंथेटिक उत्तेजक अंमली पदार्थाची निर्मिती करणाऱ्या अटकेत असलेल्या आठ आरोपींविरुद्ध मुंबई गुन्हे शाखेने आरोप पत्र दाखल केले आहे. गेल्या महिन्यात, ANC ने पालघर जिल्ह्यातील नालासोपारा, ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ आणि गुजरातमधील अंकलेश्वर येथे छापे टाकून सुमारे २,५०० कोटी रुपयांचे मेफेड्रोन जप्त केले होते. या कारवाईत आठ जणांना अटक करण्यात आली असून. सध्या ANC ड्रग्जची तस्करी करणाऱ्यांचा शोध घेत आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here