Dr. Rahul Aaher | चांदवडच्या सभेत राहुल आहेरांनी देवळावासियांची मागितली माफी; म्हणाले, ‘माझी चुक झाली…’

0
69
#image_title

Dr. Rahul Aaher | विधानसभा निवडणुकीसाठी प्रचाराचा आजचा शेवटचा दिवस असून देवळा-चांदवड विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार डॉ. राहुल आहेर यांच्या प्रचारार्थ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची चांदवड येथे जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी राहुल आहेर यांनी, “नेते गेले, जे काही राहिले ते आता तुम्हीच राहिले आहात. ही निवडणूक खऱ्या अर्थाने तुम्हीच हातात घेतली आहे.” असं म्हणत आपल्या भाषणाची सुरुवात केली. यावेळी त्यांनी विकास कामांवर बोलत विरोधकांवरही निशाणा साधला.

Dr. Rahul Aaher | ‘जनतेचं हित पाहताना, नेत्याचं हित कुठेतरी बिघडलं’; राहूल आहेरांचं केदा आहेरांविषयी अप्रत्यक्ष वक्तव्य

टीका करणे माझी संस्कृती नाही

“ज्यांना ज्यांना काही लाभ मिळाला ते सर्व पहिलेच सोडून गेले. ज्यांना काहीच नाही मिळालं ते माझ्यासोबत राहिले.” असं म्हणत त्यांनी विरोधकांना टोला लगावला. “आज दहा वर्षानंतरही फक्त आपण केलेल्या विकास कामांच्या जोरावर मतांचा जोगवा मागतोय. विरोधकांना टीका करायला जागा नाही म्हणून ते आमदार फोन उचलत नाही असं म्हणतात. दहा वर्ष काम करत असताना कधीच आपल्या उमेदवारीचा बडेजाल केला नाही. काही गोष्टी बोलल्या नाहीत तर त्या जास्त बऱ्या राहतात. पण ज्या पद्धतीने मागच्या दोन-तीन आठवड्यात राजकारण सुरू आहे. ही पंधरा दिवसांची निवडणूक होऊन जाईल. पण लोकांचे मतभेद, मनभेद करून संभ्रम पसरवून, खोटेनाटे आरोप करणं याला कुठलीतरी मर्यादा असायला पाहिजेत. एवढेच बोलावं वाटतं. टीका करणे ही भाजपची संस्कृती नाही आणि माझी पण संस्कृती नाही. त्यामुळे विरोधक काहीही बोलले तरी, त्याच्यावर जसाच्या तसा उत्तर देण्यात ऐवजी मी माझ्या कामातून उत्तर देईल, हा शब्द देतो.” असं म्हणत जनतेला आश्वस्त केले.

विरोधक संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. 

विकास कामाबद्दल बोलताना त्यांनी महायुतीकडून राबविण्यात आलेल्या प्रकल्पांचा पाढा वाचला. “गेल्या दहा वर्षांपासून या जलसंधारणा आणि जलसिंचनाची कामे सरकार दरबारी पाठ पुरवठा करत राहून हे मोठ्या प्रमाणात सोडवण्याचे काम केले. तसेच ‘देवळ्याचा प्रकल्प झाला. मग चांदवडचा का होत नाहीये?’ म्हणत विरोधक संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. गिरणार खोऱ्याचा प्रकल्प झाला आहे. गोदावरी खोऱ्याचाही प्रकल्प झाल्याशिवाय राहणार नाही.” असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

जनता संभ्रमावस्येतून बाहेर… 

पुढे बोलत, “7,452 कोटींचा नारपार प्रकल्प देवेंद्र फडणवीसांमुळे झाला. याचा मी साक्षीदार आहे. काही महिन्यातच पार गोदावरी प्रकल्पाला मान्यता मिळेल असा दावा त्यांनी केला. तसेच “एक ना अनेक नदीजोड प्रकल्प महायुती सरकारने उपलब्ध करून दिले असून 70 ते 80% सिंचनाची कामे आज पूर्ण झाली आहेत. देवळा तालुक्यात सुरुवातीला संभ्रमावस्था होती. पण आज दोन-तीन आठवड्यात लोक त्या संभ्रमावस्थेतून बाहेर आली आहेत.” असेही ते यावेळी म्हणाले.

Dr. Rahul Aaher | ‘गोदावरी प्रकल्प होणार ही काळ्या दगडावरची रेघ’; उमराणे येथील सभेत राहुल आहेरांचे आश्वासन

देवळावासीयांची मागितली माफी

“मला देवळ्या तालुक्याच्या जनतेची माफी मागायची आहे. मी कुठेतरी तुमच्याबरोबर संपर्क ठेवायला कमी पडलो. आम्ही जेव्हा याबाबत चर्चा केली, तेव्हा ज्येष्ठ नेते म्हटले की, ‘जनतेने तुला तिथे निवडून दिलं होतं. तेव्हा जनतेच्या प्रति तुझी जबाबदारी होती की, त्यांच्याशी नाळ ही तू जोडून ठेवायला पाहिजे होती.’ पण तरीही आज तुम्ही मला पदरात घेतलं. आज तरीही सामान्य जनता मला प्रतिसाद देत आहे. त्यामुळे मी तुमची साथ कधीच सोडणार नाही.” असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले. “मी नेत्यांऐवजी जनतेशी इमान राखला म्हणून नेते सोडून गेले, पण जनता माझ्या मागे उभी राहिली.” असे ही ते यावेळी म्हणाले.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here