Dr. Rahul Aaher | ‘जनतेचं हित पाहताना, नेत्याचं हित कुठेतरी बिघडलं’; राहूल आहेरांचं केदा आहेरांविषयी अप्रत्यक्ष वक्तव्य

0
73
#image_title

Dr. Rahul Aaher | विधानसभा निवडणुकीसाठी अवघे काहीच दिवस शिल्लक राहिले असून प्रचाराला वेग आला आहे. नाशिकच्या देवळा-चांदवड विधानसभा मतदारसंघाचे महायुतीतील घटक पक्ष असलेल्या भाजपचे उमेदवार डॉ. राहुल आहेर यांची आज दिनांक 15 नोव्हेंबर रोजी लोहोणेर येथे जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. आतापर्यंतच्या सभांमध्ये त्यांनी विकास कामांवर लक्ष केंद्रित केले असून विरोधकांवर निशाणा साधला होता. परंतु या सभेत त्यांनी पहिल्यांदाच अप्रत्यक्षरीत्या केदा आहेरांविषयी भाष्य केले आहे.

Dr. Rahul Aaher | ‘गोदावरी प्रकल्प होणार ही काळ्या दगडावरची रेघ’; उमराणे येथील सभेत राहुल आहेरांचे आश्वासन

महायुतीच्या विकासकामांचा पाढा वाचला

“महाविकास आघाडीच्या तीन वर्षांच्या कालावधीत मविआने शेतकरी, कष्टकरी, महिलांसाठी एकही रुपया खर्च केला नाही.परंतु महायुतीने शेतकरी, कष्टकरी, महिला, बांधकाम कामगार, आदिवासी, दलित बांधव, ज्येष्ठ नागरिक यांच्यासाठी योजना आणल्या. लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत देवळात-चांदवड मतदार संघात महायुती सरकारने 75 कोटी रुपये या दिवाळीला दिले आहेत. तसेच कष्टकरी कामगारांसाठी कामगार मंत्रालय बांधकाम कामगारांना मॉर्डन किट, घरेलू उपयोगी वस्तू, विमा, पेन्शन देत असून तुमच्या लग्नापासून, मुलाबाळांच्या शिक्षणापर्यंत मदत करत आहे.” असं म्हणत महायुतीच्या विकासकामांचा पाढा वाचला. पुढे बोलत, “नार पार गिरणार प्रकल्पाला न्याय देण्याचे काम महायुती सरकारने केले असून पुढच्या महिन्यात प्रकल्प सुरू होताच देवळा-चांदवडचे नंदनवन झाल्याशिवाय राहणार नाही.” अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

Deola | नुकसानीच्या पंचनाम्याचे आदेश; नुकसानग्रस्त पिकांची आ. राहुल आहेर यांनी केली पाहणी

केदा आहेरांविषयी अप्रत्यक्षरीत्या भाष्य

“काम करणारे हात जरी वेगळे असले तरी देणाऱ्याचे हात वेगळे राहतात. देणाऱ्याचे हात पहा. घेणारे घेऊन थकतात. पण देणारे देण्याचे थांबत नाहीत. आता घेणारे पण आपल्यामध्ये राहिले नाहीत…सगळे नेते एकीकडे आणि ही जनता एकीकडे. आज मला प्रचारासाठी कुठल्याही नेत्याची गरज पडत नाही. आज मतदार संघात जिथे जिथे माझे दौरे होतात. तिथे अनेकांना अनेक टोळ्या घेऊन प्रचार करावा लागतो. या राहुल आहेरवर सगळे उमेदवार प्रचारात टीका करतात. पण ही जनता सुज्ञ आहे. जे काम केले, ते तुमच्या डोळ्यासमोर आहे. प्रामाणिकपणे केलेले आहे. त्यामुळेच काही नेते माझ्यापासून दूर झालेत, कारण मी जनतेचा हित मी आधी बघितलं, नेत्याचा हित कुठेतरी बिघडलं असेल.” असं म्हणत राहुल आहेरांनी पहिल्यांदाच केदा आहेरांविषयी अप्रत्यक्षरीत्या भाष्य केले आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here