दिंडोरी तालुक्यात महसूल सप्ताहनिमित्त युवा संवाद संपन्न

0
20

दिंडोरी: दि. १ ते ७ ऑगस्ट पर्यंत महसूल सप्ताह सुरु असून त्यानिमित्त मातेरेवाडी येथे महसूल विभागाच्या वतीने युवा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नायब तहसीलदार बकरे रावसाहेब होते. यावेळी प्रथम सत्रात विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षा व करिअर मार्गदर्शन शिबिर घेण्यात आले. दुसऱ्या सत्रात इ-पिक पाहणी तसेच घर बसल्या अनोंदनिकृत नोंदीचे कागदपत्र PDE मधून कसे अपलोड करायचे याबाबत ची कार्यपद्धती बाबत मार्गदर्शन करण्यात आले.

यावेळी तिसऱ्या सत्रामध्ये उत्पन्नाचे प्रमाणपत्र, आधिवास प्रमाणपत्र व नॉन क्रिमिलर प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले. यावेळी मंडल अधिकारी प्रिती अग्रवाल, मातेरेवाडी तलाठी अजय भोये , बोपेगाव तलाठी गजकुमार पाटील यांची उपस्थिती होती.

कार्यक्रमाचे आयोजन व मार्गदर्शन वरखेडा मंडळ अधिकारी प्रिती अग्रवाल तसेच बी . के. कावळे हायस्कूलचे मुख्यध्यापक – बी.के. शेवाळे यांनी केले होते. कार्यक्रमाचे सूत्र संचालन भुसाळ सर यांनी केले तसेच आभार प्रदर्शन – बोराडे सर यांनी केले. याप्रसंगी विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते व सर्वांनी मार्गदर्शन शिबिर व युवा संवाद संकल्पनेचे कौतुक केले.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here