वैभव पगार – प्रतिनिधी: दिंडोरी | मूलभूत सोयीसुविधांसाठी व शेतकऱ्यांच्या विकासासाठी सर्वसमावेशक विचारधारेचे महाविकास आघाडी प्रणित सरकार येणे गरजेचे आहे. त्यासाठी सुनीताताई चारोस्कर यांना भाऊबीजेची मतदान रुपी भेट देऊन भरघोस मतांनी निवडून देऊया. असे प्रतिपादन मविप्र संचालक व माजी जि. प. सदस्य व शिवसेना नेते प्रविनाना जाधव यांनी केले. ते मोहाडी येथे प्रचार सभेप्रसंगी बोलत होते.
पुढे ते म्हणाले की, गेल्या चाळीस वर्षे व गेल्या वीस वर्षें किती विकास झाला यांच चिंतन केले असता खाजगीकरणाकडे देशाची वाटचाल सुरू आहे व यात शेतकऱ्यांचा तोटा आहे. तसेच कितीतरी हजार प्राथमिक शाळा बंद करण्याचा व खाजगीकरण करण्याचा निर्णय हे सरकार घेत आहे. मूलभूत सुविधांव्यतिरिक्त जातपात धर्म यामध्ये अडकवून ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. तर मंदिर मज्जिद यामध्ये न अडकता मतदान करणे गरजेचेच आहे.
Dindori | मराठी अध्यापक संघाच्या जिल्हाध्यक्षपदी सुरेश सलादे यांची निवड
खाजगीकरण घातक
खाजगीकरण करून हे सरकार आदानी आणि अंबानींना मोठं करण्याचं काम करतयं. मात्र सर्व सामान्य माणसाची लूट केली जाते आहे. सामान्य माणसाला लुटून आदानी व अंबानीच्या घशात सरकारी प्रॉपर्टीज घालायच्या, असं काम हे मोदी सरकार करत आहे. त्यातूनच गावोगाव लुटारीच्या टोळ्या उभ्या करण्याचे काम हे सरकार जणू करत आहे. यातून हा देश लुटायचा काम चालू आहे याचं आत्मचिंतन आपण मतदारांनी करणे गरजेचे आहे.
शेतकरी म्हणून एक होण्याची गरज
या आधी पूर्वीच्या सरकारांनी शेतकऱ्यांसाठी कृषी महामंडळ उभारली परंतु मोदी सरकारने त्याची वाटोळे केले. अण्णाभाऊ साठे महामंडळ असेल, कुठलेही महामंडळाला हे सरकार पैसा पुरवत नाही. आज एसटी महामंडळ आहे म्हणून सामान्यांना प्रवास सुखाचा करता येत आहे. तसेच वीज महामंडळ जे आहे. त्यामध्ये फक्त 24 तास मोफत वीज अशी घोषणा केली जाते. परंतु फक्त भांडवलदारांनाच चोवीस तास वीज पुरवली जाते आणि शेतकऱ्यांच्या वाट्याला दिवसाचे भारनियमन व रात्री लाईट अशी स्थिती आहे. यापूर्वी शेतकऱ्याला भरपूर साऱ्या सबसिडी दिल्या जायच्या खत असतील. ड्रीप असेल अशा गोष्टींवरची सबसिडी दिली जायचे, परंतु गेल्या वीस वर्षात मोदी सरकारने याच्या काळात किती सबसिडी दिल्या जजातात. याचे आत्मचिंतन होणे गरजेचे आहे. वेगवेगळे धर्म जात पंथ विचारधारा व्यवसाय यांची वेगवेगळे असलेल्या लोकांनी आपण फक्त शेतकरी म्हणून एकत्र येत नाही तोपर्यंत त या देशाचा राज्याचा खुंटलेला विकास हा होणार नाही. शेती टिकली तर देश टिकेल.
Dindori | दिंडोरीतुन शिंदे गटाचे धनराज महालेंची माघार
विचारधारा महत्त्वाची आहे
ते पूढे म्हणाले की, आपण सगळ्यांनी एका विचारधावरेला धरून भगरे सरांना भरघोस मतांनी निवडून दिले. त्याचप्रमाणे दिंडोरी तालुक्यामध्ये विकास या नावाखाली विचारधारा संपुष्टात आलेली आहे. आजूबाजूच्या तालुक्यांचा विकास बघता दिंडोरीचा विकास गेला कुठे याचं आत्मचिंतन गरजेचं आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम