Dindori | मराठी अध्यापक संघाच्या जिल्हाध्यक्षपदी सुरेश सलादे यांची निवड

0
36
#image_title

वैभव पगार – प्रतिनिधी: दिंडोरी | नाशिक जिल्हा मराठी अध्यापक संघाच्या अध्यक्षपदी कादवा कारखाना येथील बी. के. कावळे माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयाचे शिक्षक सुरेश सलादे यांची दुसऱ्यांदा निवड झाली. उपाध्यक्षपदी विजय पवार तर सरचिटणीस म्हणून सतीश सोनवणे यांची निवड करण्यात आली.

Dindori | दिंडोरीतुन शिंदे गटाचे धनराज महालेंची माघार

नाशिक जिल्हा मराठी अध्यापक संघाची रानवड येथे झालेल्या बैठकीत निवड

नाशिक जिल्ह्यात मराठी भाषेसाठी प्राथमिक ते महाविद्यालयीन शिक्षण संस्थांमधून विविध प्रचार प्रसाराचे उपक्रम राबवणाऱ्या नाशिक जिल्हा मराठी अध्यापक संघाची रानवड येथे नुकत्याच झालेल्या बैठकीत ही निवड करण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य शिवाजी पवार होते. इतर कार्यकारिणीत चिटणीसपदी प्राचार्य महेश वाघ, सल्लागार म्हणून शिवाजी पवार, विश्वस्तपदी दिनकर रसाळ, मृणाल वैद्य, सरला जाधव, प्राचार्या जयश्री पवार, समाधान गांगुर्डे, ज्ञानेश्वर कावळे यांचा समावेश आहे. जिल्हा पातळीवर निबंध, वक्तृत्त्व, चित्रकला, सुंदर हस्ताक्षर, कविवर्य कुसुमाग्रज शिक्षक सन्मान हे उपक्रम राबवण्याचे ठरवण्यात आले.

Dindori | सामाजिक कार्यकर्ते बापू चव्हाण यांच्या तर्फे करंजी मोलाची उपक्रम

लक्षवेधी उपक्रम राबवणार

यावेळी आपल्या मनोगतात अध्यक्ष सुरेश सलादे म्हणाले की , आपण सर्व पदाधिकाऱ्यांच्या आणि सभासदांच्या सहकार्याने अभिजात मराठी भाषेसाठी आखीव रेखीव नियोजनबद्ध आणि लक्षवेधी उपक्रम राबविणार आहोत. लवकरच नाशिक जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात मराठी अध्यापक संघाची शाखा सुरू करण्यात येईल असेही सांगितले.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here