Dindori | साहित्यकणा कवी कट्टा अध्यक्षपदी संदीप जगताप

0
6
Dindori
Dindori

वैभव पगार – प्रतिनिधी : दिंडोरी | फेब्रुवारीला होणाऱ्या साहित्यकणा फाउंडेशनच्या अकराव्या साहित्य संमेलनाच्या कविकट्ट्याच्या अध्यक्षपदी दिंडोरी तालुक्यातील कवी संदीप जगताप यांची निवड केली असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष संजय द. गोराडे यांनी माहिती दिली. जगताप यांचा भुईभोग नावाचा कवितासंग्रह प्रसिद्ध आहे. त्याला अनेक राज्यस्तरीय पुरस्कार मिळालेले आहेत. संमेलनाच्या अध्यक्षपदी साहित्य अकादमीचे सदस्य प्रा. डॉ. नरेंद्र पाठक असून, उद्घाटन माजी पोलीस महानिरीक्षक डॉ. बी. जी. शेखर पाटील हे करणार आहेत.

Sandip Jagtap | संदीप जगताप यांच्या कवितांनी जिंकली अमेरिकेतील मराठी रसिकांची मने

साहित्यकणा फाउंडेशन व महाराज्य राज्य साहित्य संस्कृती मंडळ यांच्या विद्यमाने आयोजित हे साहित्य संमेलन समर्थ मंगल कार्यालय, कॅनडा कॉर्नर, नाशिक होणार असल्याचे सचिव विलास पंचभाई यांनी सांगितले आहे. या संमेलनात खुले कविसंमेलन, निमंत्रितांचे कविसंमेलन, चर्चासत्र, परिसंवाद, कथाकथन, वाड्मय व नाशिकभूषण पुरस्कार वितरण आदी भरगच्च कार्यक्रम आहेत. संमेलनाला साहित्य रसिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here