सोमनाथ जगताप – प्रतिनिधी : देवळा | देवळा तालुका क्रीडा स्पर्धा प्रमुख व देवळा पब्लिक स्कूलचे क्रीडा शिक्षक सुनिल देवरे यांना क्रीडा, योग व शैक्षणिक क्षेत्रातील योगदानाबद्दल स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त आयोजित “राष्ट्रीय युवा दिन” कार्यक्रमात दिल्ली येथे विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत “स्वामी विवेकानंद युथ आयकॉनिक अवार्ड -२०२५” या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. अखिल भारतीय योग शिक्षक महासंघाने आयोजित राष्ट्रीय कार्यक्रमास आचार्य पवन दत्त मिश्रा, स्वामी अमित देव, दिल्ली पोलिस अकॅडमी डायरेक्टर जितेंद्र त्रिपाठी, डे.कलेक्टर मंगेराम चव्हाण, डॉ. भारती आचार्य, कर्नल अमरदीप त्यागी, कारगील योध्दा अखिलेश सक्सेना आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
Deola | देवळा बाजार समितीचे सभापती योगेश आहेर यांचा वाढदिवस साजरा
शिक्षक सुनिल देवरे यांनी क्रीडा, योगा व शैक्षणिक क्षेत्रात केलेल्या उत्कृष्ट कामगिरीमुळे ५०० हुन अधिक राज्यस्तरावर, ५० हुन अधिक खेळाडू राष्ट्रीय स्तरावर तर २ खेळाडू आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहचवले आहेत. या गुणवंत खेळाडूतून अनेक विद्यार्थी खेळाडू वर्ग-१, वर्ग -२ पदावर तसेच समाजातील विविध मानाच्या पदांवर कार्यरत आहेत. या पुरस्काराबद्दल देवरे यांचे मुख्यकार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल अग्रवाल, शिक्षणाधिकारी नितीन बच्छाव, गटविकास अधिकारी राजेश कदम, गटशिक्षणाधिकारी सतिष बच्छाव, आदींसह रोटरी क्लब, तालुका क्रीडा विभागाकडून अभिनंदन केले जात आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम