Dindori | दिंडोरीतील शासकीय आरोग्यकेंद्रांमध्ये श्वानदंशावरील लसींचा तुटवडा

0
2
Dindori
Dindori

वैभव पगार – प्रतिनिधी : दिंडोरी |  तालुक्यात ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र तसेच स्व. बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्यात गेल्या काही महिन्यांपासून श्वानदंशावरील लस उपलब्ध नसल्यामुळे रुग्णांची गैरसोय होत आहे. हीच परिस्थिती जिल्ह्यातील अनेक ठिकाणी असल्याचे समजते. काही ठिकाणी स्वखर्चाने बाजारातून ही लस घ्यावी लागत आहे. त्यामुळे याकडे शासनाने गांभीर्याने लक्ष देऊन जिह्यातील आरोग्यकेंद्रात ही लस लवकरात लवकर उपलब्ध करून द्यावी अशी मागणी दिंडोरी नगरपंचायतीचे नगरसेवक तथा भाजप शहराध्यक्ष नितीन गांगुर्डे यांनी केली आहे.

दिंडोरी शहरासह तालुक्यात भटक्या कुत्र्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. स्वानदोष झाल्यास ग्रामीण रुग्णालय उपकेंद्र तसेच स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्यात कोणतेही प्रकारची उपाययोजना उपलब्ध नसल्याने रेबीस सारखे आजाराची शक्यता निर्माण झाली आहे. काही वेळेस डॉक्टर स्वखर्चाने लस उपलब्ध करतात. अनेक गावात कुत्र्यांची संख्या वाढल्याने नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. तालुक्यात भटक्या कुत्र्यांची तसेच पिसाळलेल्या श्वानांची दहशत निर्माण झाली असून, अनेक ठिकाणी भटके कुत्रे अनेकांना चावा घेत असल्याने ते जखमी होत आहे.

Dindori | डोळ्यांतून निरीक्षण व सकारात्मकता जागृत ठेवली तर संशोधन होते – मविप्र संचालक प्रवीण जाधव

परंतु त्यांना लस घेण्यासाठी ग्रामीण रुग्णालय प्राथमिक आरोग्य केंद्र तथा उपकेंद्र, स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे आपला  दवाखान्यात लस उपलब्ध नसल्यामुळे रुग्णांना स्वखर्चाने बाजारातून ही लस घ्यावी लागत आहे. त्यामुळे शासनाने श्वानदंशावरील लस मुबलक प्रमाणात उपलब्ध करून द्यावी अशी मागणी दिंडोरी नगरपंचायत चे नगरसेवक तथा भाजप दिंडोरी शहराध्यक्ष नितीन गांगुर्डे यांनी केली आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here