वैभव पगार – प्रतिनिधी : दिंडोरी | डोळ्यांतून निरीक्षण सकारात्मकता जागृत ठेवली तर संशोधन होते. कानाने सर्वतोपरी श्रवण करा हाच यशाचा मूलमंत्र असल्याचे प्रतिपादन मविप्र संचालक प्रवीण जाधव यांनी केले. जनता इंग्लिश स्कूल व उच्च माध्यमिक विद्यालयात शालेय स्तर विज्ञान प्रदर्शन व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन कार्यक्रमाप्रसंगी प्रवीण नाना जाधव अध्यक्ष स्थानावरून बोलत होते. ते पुढे म्हणाले “शिस्तीचे धडे म्हणजे भविष्याचा सुंदर जीवनाचा मार्ग आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त विनम्र अभिवादन करत लोकशाहीत जगण्याचा सन्मार्ग दाखवण्याचा ज्यांनी अहोरात्र प्रयत्न केला अशा महामानवास विनम्र अभिवादन”.
विज्ञान प्रदर्शनात भाग घेणारे सर्व विद्यार्थी व शिक्षकांचे त्यांनी यावेळी भरभरून कौतुक केले. माणसातील सकारात्मक ऊर्जा म्हणजे ‘विज्ञान’. नवीन शोधांमुळे मानवात क्रांती झाली. पुढे हे संशोधन वाढत गेले आणि आजचे धावते जग पुढे आले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान रचले. लोकशाहीचा पाया घातला. डॉक्टर सी.व्ही रामन यांनी संशोधन करून जगासमोर 0500 वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवला. शाळेत शिक्षक तळमळीने या वैज्ञानिकांची मूल्य विचार विद्यार्थ्यांमध्ये रुजवण्याचा प्रयत्न करतात आणि प्रदर्शनातून या संकल्पना आपल्याला दिसत असतात. सृजनशक्तीला चालना देत असतं. श्रद्धा असावी पण अंधश्रद्धा नसावी. वैज्ञानिक दृष्टिकोन जोपासावा शोध लावले तर यश मिळते व मानवाचे हित होते. जेम्स वॅट एक्स-रे न्यूटन जॉर्ज वॉशिंग्टन थॉमस अल्वा एडिसन ग्रॅम बेल या शास्त्रज्ञांनी छोट्या संशोधनातून ते जगात महान ठरले व अजरामर झाले.
Dindori | थोरात विद्यालयात भरला बाल वैज्ञानिकांचा मेळावा
आज भविष्यातील अनेक पिढ्यांना त्यांचे विचार व संशोधन कार्य मार्गदर्शक आहे. यावेळी मविप्र संचालक प्रवीण जाधव, माध्यमिक शालेय समिती अध्यक्ष बाळासाहेब मुरकुटे, शालेय समिती सदस्य कैलास भाऊ मवाळ, गणपत जाधव, मधुकर जाधव, प्रा. शरद शेजवळ आदी LTE उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर, डॉ. सी.व्ही. रमण, सरस्वती प्रतिमेचे पूजन करण्यात आले. संगीत शिक्षिका देशपांडे यांनी व गितमंचाने विज्ञानगीत सादर केले. प्रास्तविक प्रा. शरद शेजवळ यांनी केले. प्रास्तविकात शेजवळ यांनी सांगितले की, संशोधन व सृजनशीलता विकास डोळ्यासमोर ठेवून विज्ञान प्रदर्शन उपक्रम राबवलेला आहे. सर्व विज्ञान शिक्षक वर्ग शिक्षक व सहभागी विद्यार्थी यांच्या सहकार्यातून हा उपक्रम संपन्न झाला आहे. तंत्रज्ञान विज्ञान एकत्र येऊन जलकल्याण साधण्यासाठी विज्ञान प्रदर्शने आयोजित करून विद्यार्थ्यांच्या सृजनशीलतेला वाव देणे हा यामागील मुख्य उद्देश आहे.
तसेच ज्यांनी संविधान लिहून भारताला कायद्याच्या चौकटीत बसवण्याचे महान कार्य केले अशा महामानवास विनम्र अभिवादन आज देशभर त्यांच्या स्मृतींना अभिवादन केले जात आहे. यावेळी आकाशात फुगे व रॉकेट सोडत, विज्ञान तोफांची सलामी देत मान्यवरांच्या हस्ते विज्ञान प्रदर्शनाचे उदघाटन करण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांनी काढलेल्या वैज्ञानिक रांगोळीच्या कक्षाचे उदघाटन करून पाहणी व निरीक्षण केले. कैलास मवाळ यांनी मार्गदर्शन करतांना वैज्ञानिक दृष्टिकोनातून मानवहित साधलं गेलं पाहिजे यासाठी हे उपक्रम असतात आणि हेच काम विद्यार्थी पुढे नेतील. विज्ञान शिक्षिका शितल आहेर यांनीही विज्ञान म्हणजे विशेष ज्ञान श्रद्धा ठेवा पण अंधश्रद्धा नाही मनुष्य सुंदर जीवन जगण्यास योग्य मार्गदर्शन करणारे ज्ञान म्हणजे विज्ञान वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करणे होय.
यावेळी इयत्ता ५ वी ते १० वीच्या १३० विद्यार्थ्यांनी विज्ञान मॉडेल तयार केले व मान्यवरांना त्याचे महत्व पटवून दिले. तसेच ६९ विद्यार्थ्यांनी वैज्ञानिक रांगोळी काढून विज्ञानाचे महत्व त्यातून सांगितले. परीक्षक म्हणून ज्यू. कॉलेजच्या श्रीमती भवर, श्रीमती भोई, श्रीमती बोरसे, श्रीमती कोर यांनी काम पाहिले. या सर्व विद्यार्थ्यांना प्रा. शरद शेजवळ, उपप्राचार्य उत्तम भरसठ, पर्यवेक्षक सविता शिंदे, रावसाहेब उशीर, सर्व विज्ञान शिक्षक, सांस्कृतिक समितीच्या सुमन वीरकर, नेहा देशमुख व सदस्य, यांचे मार्गदर्शन लाभले. सूत्रसंचालन संतोष कथार व सरला कदम यांनी तर आभार उपप्राचार्य उत्तम भरसठ यांनी मानले.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम