Dindori Loksabha | माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाणांचं चाललंय तरी काय ?

0
47
Dindori Loksabha
Dindori Loksabha

Dindori Loksabha |  जनरेट्यामुळे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण निवडणूक लढवणार असे त्यांनी प्रसार माध्यांमाना कळवून थेट मतदारसंघात गाठी भेटी सुरू ठेवल्याने त्यांच्या भूमिकेकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. दरम्यान, माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी आपल्या पक्षाकडून निवडणूक लढवावी यासाठी वंचित बहुजन आघाडी, बसपा, या पक्षांचे पदाधिकारी मनधरणी करीत असल्याची माहिती असून दिंडोरी मतदार संघातील मनसे कार्यकर्ते हेदेखील चव्हाणांना गळ घालत आहेत. मात्र, हरिश्चंद्र चव्हाणांच्या गोटातून उमेदवारी अर्ज भरल्यानंतरच पत्ते उघडे करू असे सांगितले जात आहे.(Dindori Loksabha)

Dindori Loksabha | दिंडोरीच्या इच्छुक उमेदवारांनी घेतले नाशिकच्या इच्छुक उमेदवारांचे आशिर्वाद

Dindori Loksabha | चव्हाणांच्या गुप्त बैठकांमागील राज काय?

माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी भाजपा उमेदवारास पाठिंबा नसल्याचे सांगून बंडखोरीचे संकेत दिल्याने भाजपात प्रचंड खळबळ उडाली होती. भाजपा कार्यकर्ते व शेतकऱ्यांचा विरोध असताना विद्यमान खासदार डॉ. भारती पवार यांना उमेदवारी दिल्याने हरिश्चंद्र चव्हाण नाराज आहेत. त्यांनी गनिमी काव्याने भाजपाच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या गुप्त बैठकांचा सपाटा लावला असल्याचीही माहिती समोर आली आहे. (Dindori Loksabha)

Dindori Lok Sabha | माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण दिंडोरीतून अपक्ष लढणार..?

द्राक्ष, कांद्याचा ज्वलंत प्रश्न सोडविता न आल्यामुळे कार्यकर्ते फक्त भाजपाच्या वाहत्या गंगेत हात धुऊन घेण्यासाठी वरवर फिरल्या सारखे दाखवत आहेत. मात्र काम चव्हाणांचे करीत असल्याचे उघड सांगत आहेत. आपण जनरेट्यामुळे लोकसभा निवडणुक लढवणार असल्याचे सांगितल्यानंतर माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांना मतदार संघातून चांगला प्रतिसाद मिळत आहे. माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी कार्यकर्त्यांच्या भेटी गाठी घेणे सुरुच ठेवल्याने भाजपाच्या गोटात मोठी अस्वस्थता पसरली आहे.(Dindori Loksabha)


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here