Mahayuti | रात्री शिंदे गटाच्या ‘हाय वोल्टेज’ बैठकीत काय घडलं..?

0
1
Mahayuti
Mahayuti

Mahayuti | या वर्षाच्या पहिल्याच निवडणुकीत म्हणजेच लोकसभा निवडणुकीतच महायुतीत मिठाचा खडा पडल्याचे दिसत आहे. तर, जागावाटपावरून तिन्ही पक्षांमध्ये बिनसले आहे. कारण लोकसभा निवडणुकीतच भाजपने आपला सर्वे आणि स्थानिक भाजप नेत्यांचा दबाव यामुळे आधीच जागा कमी मिळाल्या असून, त्यातही शिंदेसेनेच्या अनेक विद्यमान खासदारांचे तिकीट  कापले गेले असून, त्यामुळे शिंदेसेनेत अस्वस्थता पसरली आहे. वरवर महायुतीत सर्व गुण्यागोविंदाने सुरू आहे.(Mahayuti)

असे जरी दाखवले जात असले तरीही अंतर्गत खदखद ही कोणापासून लपलेली नाही. दरम्यान, आज राज्याच्या राजकारणाचे केंद्र बनलेल्या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी शिंदे गटाची ‘हायवोल्टेज बैठक’ काल रात्री पार पडल्याची माहिती आहे. या बैठकीत “आमच्यामुळेच आज महाराष्ट्रात भाजप सत्तेत आले असून, त्यामुळे त्यांच्या दबावाला आम्ही बळी पडणार नाही” अशी भूमिका शिंदे गटाच्या नेत्यांनी या बैठकीत मांडली आहे. (Mahayuti)

“महायुतीत जागावाटपाच्या बाबतीत भाजप वेळोवेळी शिंदे गटाची कोंडी करण्याचा प्रयत्न करत असून, महायुतीत केवळ शिवसेनाच युतीधर्म पाळत आहे.” अशी भूमिका शिंदेसेनेच्या नेत्यांनी कालच्या या बैठकीत घेतली. तसेच “आपण उठाव केल्यामुळेच भाजपला आज सत्तेची फळे चाखता येत असून, त्यामुळे आपल्या पक्षाचे महत्त्व हे अधिक आहे. मात्र, जागावाटपात आपल्याच खासदारांचे तिकीट कापले जात असून, आता आपण भाजपच्या दबावाला बळी पडण्याची गरज नसल्याची आक्रमक भूमिका शिंदे गटाच्या नेत्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मांडल्याची माहिती समोर आली आहे. (Mahayuti)

Mahayuti Seat Sharing | गोडसेंना पुन्हा आश्वासन; रात्री ‘वर्षा’वर काय काय घडलं..?

Mahayuti | नेमकी नाराजी का..?

  • महायुतीमध्ये रायगड, शिरूर हे शिवसेनेचे मतदारसंघ मित्र पक्षाला देण्यात आले.
  • परभणी, धारशिव लोकसभा मतदारसंघ देऊन शिवसेनेने युतीधर्म पाळला आहे.
  • मात्र, आपल्या मित्रपक्षांकडून युतीधर्म पाळला जात आहे का?
  • आपल्याच खासदारांची उमेदवारी डावलली जात असून, आता आपण दबावाला बळी पडू नये.
  • कोणत्याही परिस्थितीत नाशिक, ठाणे, पालघर, औरंगाबाद, रत्नागिरी- सिंधुदुर्ग हे आपले लोकसभा मतदारसंघ जाऊ देऊ नका.
  • अन्य पक्षाच्या लोकांकडून हे आपल्या पारंपरिक मतदारसंघांवर दावा केला जात आहे.
  • आतापर्यंत लोकसभा जागावाटपात आपण चार मतदारसंघ सोडले असून, हे योग्य नाही.  (Mahayuti)

Mahayuti Sarkar | मनसे-भाजप युतीच्या हालचाली; मनसेला इतक्या जागा देणार..?

शिवसेनेची तडजोड 

शिंदेसेनेचे विद्यामन खासदार यवतमाळ-वाशिम मतदार संघाच्या विद्यमान खासदार भावना गवळी, आणि हेमंत पाटील यांचे तिकीट हे भाजपच्या दबावामुळे कापण्यात आली. यानंतर शिवसेनेकडून रायगड आणि शिरूर हे मतदारसंघही मित्रपक्षाला देण्यात आले. एवढेच नाहीतर परभणी, धारशिव या मतदारसंघांवरीलही दावा शिवसेनेने सोडला आहे. यातच आता नाशिक, ठाणे, पालघर, छत्रपती सांभाजीनगर, रत्नागिरी- सिंधुदुर्ग या लोकसभा मतदारसंघांवरही मित्रपक्ष दावा करत असल्यामुळे शिंदे गटाच्या नेत्यांमध्ये प्रचंड नाराजी असून, शनिवारी झालेल्या शिंदे गटाच्या बैठकीत या नेत्यांची आपली खदखद व्यक्त केली आहे. यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी संतापलेल्या नेत्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. (Mahayuti)


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here