Dindori Lok Sabha | नाशिकनंतर आता दिंडोरी लोकसभा मतदार संघ हा अनेक कारणांमुळे चर्चेत आहे. नुकतंच येथे महाविकास आघाडीत वाद निर्माण झाला असून, माकपचे माजी आमदार जे पी गावीत यांनी निवडणूक लढवण्याचा निर्धार केला असून, जाहीर सभा घेत “दिंडोरीची जागा माकपला द्या, नाहीतर तुमचा उमेदवार पाडू, असा थेट इशारा दिला आहे. तर, दुसरीकडे महायुतीत हरिश्चंद्र चव्हाण हेदेखील बंड करण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे. (Dindori Lok Sabha)
एकीकडे महायुतीत नाशिकचा उमेदवार जाहीर होत नसून, दुसरीकडे आता आपल्याच गटातील विरोधामुळे दिंडोरीचे राजकारण तापलेले आहे. यातच आता वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनीही दिंडोरी लोकसभेचा उमेदवार बदलला आहे. काही दिवसांपूर्वीच वंचित बहुजन आघाडीने लोकसभा निवडणुकीसाठी आपल्या उमेदवारांची पाचवी यादी जाहीर केली असून, या यादीत दिंडोरी लोकसभेच्या उमेदवाराचेही नाव जाहीर करण्यात आले होते. मात्र, आता अचानक प्रकाश आंबेडकर यांनी दिंडोरी लोकसभेचा उमेदवार बदलला आहे. (Dindori Lok Sabha)
Dindori Lok Sabha | माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण दिंडोरीतून अपक्ष लढणार..?
Dindori Lok Sabha | ‘या’ आहेत वंचितच्या नव्या उमेदवार
दरम्यान, वंचित बहुजन आघाडीने जाहीर केलेल्या पाचव्या यादीत दिंडोरी लोकसभेतून गुलाब मोहन बर्डे यांची उमेदवारी जाहीर केली होती. मात्र, आता त्यांनी आरोग्याच्या कारणास्तव माघार घेतल्याने वंचितने नवा उमेदवार जाहीर केला आहे. तर, यानुसार आता वंचितकडून मालती शंकर थविल या दिंडोरी लोकसभा मतदार संघातून लोकसभा निवडणूक लढवणार आहेत. (Dindori Lok Sabha)
Dindori Loksabha | दिंडोरीत आघाडीत बिघाडी; गावितांचा शरद पवारांना थेट इशारा
दिंडोरीत अशी रंगणार लढत
दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून महायुतीच्या अधिकृत उमेदवार म्हणून भाजपने पुन्हा एकदा विद्यमान खासदार तथा केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार तर, दुसरीकडे महाविकास आघाडीकडून शरद पवार गटाचे भास्कर भगरे हे मैदानात उतरणार आहे. यात वंचितचाही समावेश झाला असून, वंचित बहुजन आघाडीकडून मालती थविल या नव्या उमेदवार असणार आहेत. तर, जे पी गावीत यांनीही दंड थोपटले असून, त्यांची मनधरणी करण्यात महाविकास आघाडीला यश आले नाहीतर, ते येथील चौथे उमेदवार असणार आहेत. दरम्यान, यापैकी कोणाचे पारडे जड असेल आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून कोण बाजी मारणार? हे पाहणे मोठे औत्सुक्याचे ठरणार आहे. (Dindori Lok Sabha)
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम