Dindori Lok Sabha Result | दिंडोरीत तुतारी वाजतेय; कांद्याने भाजप उमेदवाराचा वांदा केला..?

0
10
Dindori Lok Sabha Election Result
Dindori Lok Sabha Election Result

Dindori Lok Sabha Result |  उत्तर महाराष्ट्रातील बहुतेक ठिकाणी महाविकास आघाडी आघाडीवर असताना दिसत आहे. दरम्यान, नाशिकमध्ये पहिल्या फेरीत ठाकरे गटाचे राजाभाऊ वाजे हे आघाडीवर असून, तब्बल १०,००० मतांच्या मोठ्या फरकाने राजाभाऊ वाजे हे आघाडीवर होते. तर,  दिंडोरी लोकसभा मतदार संघातून ५०० मतांनी भाजपच्या भारती पवारांनी आघाडी घेतली होती. तर, धुळे लोकसभा मतदार संघात ७२ मतांनी कॉंग्रेसच्या शोभा बच्छाव या आघाडीवर होत्या.Dindori Lok Sabha Result

Dindori Lok Sabha Result | भास्कर भगरे आघाडीवर

दरम्यान, अता दुसरी फेरी सुरू झाली असून, या दुसऱ्या फेरीत शरद पवार गटाचे भास्कर भगरे हे आघाडीवर आहेत. पोस्टल मतमोजणीतही भास्कर भगरे हे आघाडीवर होते. माध्यमांच्या एक्जिट पोलनुसार दिडोरीत तुतारीच वाजणार भास्कर भगरे आघाडीवर असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. तो अंदाज आता खरा ठरताना दिसत असून, शरद पवार गटाचे उमेदवार भास्कर भगरे यांनी दुसऱ्या फेरीत आघाडी घेतली आहे.

Nashik Lok Sabha Result | गोडसेंना मोठा धक्का; पहिल्या फेरीत मशाल धगधगली

कांदा मोठा वांदा करणार

या मंतडा संघात कांद्याचा प्रश्न हा निर्णायक ठरला. कांदा प्रश्नामुळे दिंडोरी लोकसभेची निवडणूक चर्चेत ठरली. विद्यमान खासदार भारती पवार यांच्यासाठी कांदा मोठा वांदा करणार असा अंदाज व्यक्त केला जात होता. हा अंदाज खरा ठरणार का..? भाजपचा बालेकिल्ला हातून जाणार का..? याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. Dindori Lok Sabha Result

Dindori Lok Sabha | उत्तर महाराष्ट्रातील महायुतीच्या उमेदवारांचे देव पाण्यात; धाकधुक वाढली


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here