Dindori Lok Sabha | लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली असून, पोस्टल मतमोजणीनुसार उत्तर महाराष्ट्रात महाविकास आघाडी आघाडीवर आहे. देशात जरी एनडीआय आघाडीवर असले तरी राज्यात मात्र चित्र बदलताना दिसत आहे. राज्यात महायुतीच्या फोडाफोडीच्या राजकारणाला मतदारांनी ठेंगा दाखवला असून, महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी आघाडी घेतल्याचे दिसत आहे. उत्तर महाराष्ट्रात धुळे लोकसभेची जागा वगळता सर्व जागांवर महाविकास आघाडीचे उमेदवार पुढे आहेत.
खासदार हेमंत गोडसेंना मोठा धक्का
दिंडोरीत ५,३१० पोस्टल मतांनी शरद पवार गटाचे उमेदवार भास्कर भगरे हे आघाडीवर असून, विद्यमान खासदार भारती पवार या पिछाडीवर होत्या. नाशिकमध्ये शिंदे गटाच्या विद्यमान खासदार हेमंत गोडसेंना मोठा धक्का बसला असून, महाविकास आघाडीचे राजाभाऊ वाजे हे सुरुवातीपासूनच आघाडीवर आहेत.(Dindori Lok Sabha)
धुळे लोकसभेत भाजपचे विद्यमान खासदार डॉ. सुभाष भामरे हे आघाडीवर आहेत. जळगाव लोकसभा आमतदार संघातून भाजपमधून ठाकरे गटात गेलेले करण पवार पाटील हे आघाडीवर असून, हा भाजपच्या स्मिता वाघ यांच्यासाठी मोठा धक्का आहे. तर, नंदुरबारमधून विद्यमान खासदार हीना गावीत यांना मागे टाकत गोवाल पाडवी यांनी तब्बल १०,००० मतांनी आघाडी घेतली आहे. रावेरमध्ये रक्षा खडसे या आघाडीवर आहेत.
Lok Sabha Election Result | राज्यात मविआ आघाडीवर; महायुतीच्या उमेदवारांची धाकधुक वाढली
Dindori Lok Sabha | भारती पवार यांची ५०० मतांनी आघाडी
दरम्यान, ईव्हीएमच्या मतमोजणीत सुरुवातीपासून आघाडीवर असलेल्या भास्कर भगरेंना मागे टाकत भारती पवार यांनी ५०० मतांनी आघाडी घेतली आहे. एकूणच देशात वेगळे आणि राज्यात वेगळे चित्र असून, बहुतेक ठिकाणी महाविकास आघाडीचे उमेदवार आघाडीवर आहेत. (Dindori Lok Sabha)
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम