Dindori Lok Sabha | एकीकडे नाशिक लोकसभा मतदार संघात अजूनही महायुतीचा उमेदवार निश्चित होत नाही. तर, दुसरीकडे दिंडोरीत महाविकास आघाडीत फुट पडली आहे. दिंडोरीची जागा ही माकपला द्यावी आणि आपल्याला उमेदवारी मिळावी, यासाठी सुरुवातीपासूनच माजी आमदार जे पी गावित हे आग्रही होते. मात्र, शरद पवार गटाने या जागेवर भास्कर भगरे यांना उमेदवारी दिल्याने गावीत नाराज होते. दरम्यान, काही दिवसांपूर्वी त्यांनी जाहीर सभा घेत आपली नाराजी बोलूनही दाखवली. तसेच आपण दिंडोरी लोकसभेतून निवडणूक लढवण्यावर ठाम असून, ही जागा माकपला न सोडल्यास माकप स्वतंत्र निवडणूक लढणार आणि तुमचा उमेदवार पाडणार, असा इशाराही गावीत यांनी शरद पवारांना दिला होता. (Dindori Lok Sabha)
यानंतर तातडीने शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे त्यांनी मनधरणी करण्यासाठी दाखल झाले. मात्र, त्यांचे हे प्रयत्न सपशेल फेल झाल्याचे दिसत आहे. कारण दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून माकप निवडणूक लढण्यावर ठाम असून, जे. पी. गावित हे आज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. त्यामुळे दिंडोरीमधून जे पी गावीत निवडणूक लढवणार आणि महाविकास आघडीतील फुटीवर आज शिक्कामोर्तब झाले आहे. दिंडोरीतून माजी आमदार गावित यांच्या निवडणूक लढवण्याच्या मुद्द्यावर माकपच्या पॉलिट ब्युरो सदस्यांची दोन दिवसांपूर्वी ऑनलाइन बैठक झाली. आणि या बैठकीत गावित हे निवडणूक लढवणार असल्याचा अंतिम निर्णय झाला. (Dindori Lok Sabha)
Dindori Lok Sabha | दिंडोरी ‘वंचित’ने उमेदवार बदलला; कोण आहे नवा उमेदवार
शरद पवारांचा प्रस्ताव गावितांनी धुडकावला
दरम्यान, दिंडोरीत महाविकास आघाडीत पडत असलेली ही फुट रोखण्यासाठी जयंत पाटील गावीत यांची समजूत काढण्यासाठी आले असता, त्यांनी विधानसभेच्या मदतीचा प्रस्ताव गावितांसमोर ठेवला. मात्र, आमचा पक्ष एकदा घेतलेला निर्णय मागे घेत नसल्याचे सांगत गावित यांनी जयंत पाटलांचा गटाचा प्रस्ताव धुडकावला. यानंतर आज गावित माकपकडून दिंडोरी लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. (Dindori Lok Sabha)
Dindori Lok Sabha | माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण दिंडोरीतून अपक्ष लढणार..?
Dindori Lok Sabha | आता दिंडोरीत रंगणार चौरंगी लढत
दरम्यान, गवित निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यामुळे दिंडोरीत महायुती, महाविकास आघाडी, माकप आणि वंचित अशी चौरंगी लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. महायुतीकडून भाजपच्या विद्यमान खासदार तथा केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार (Dr Bharti Pawar), महाविकास आघाडीकडून शरद पवार गटाचे उमेदवार भास्कर भगरे, माकपचे जे पी गावित (J P Gavit) आणि वंचित बहुजन आघाडीच्या मालती थविल (Malati Thavil) या दिंडोरी लोकसभेच्या मैदानात उरणार आहेत. (Dindori Lok Sabha)
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम