Reservation | आरक्षणावरून राज्याचे राजकारण पुन्हा तापले; धनगर समाजाचा एल्गार

0
58
#image_title

Reservation : मराठा आणि ओबीसी आंदोलनाचा मुद्दा ऐरणीवर असताना राज्यभरात वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलनं केली जात आहेत. त्यातच आता धनगर समाजाने देखील पुन्हा एकदा आरक्षणाचा मुद्दा समोर आणून आरक्षणासाठी आंदोलन करणार असल्याची घोषणा केली आहे. यावेळी धनगर आरक्षणाच्या मागणीसाठी समस्त धनगर समाज राज्यस्तरीय आमरण उपोषण करणार असल्याची घोषणा सकल धनगर समाज संघटनेचे समन्वयक अमोल कारंडे यांनी माध्यमांशी बोलताना केली.

Maratha Morcha | मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर आजच तोडगा निघणार..?

Reservation | कधीपासून सुरू होणार आंदोलन? 

येत्या 9 सप्टेंबरपासून धनगर समाजाच्या वतीने आमरण उपोषणाला सुरुवात होणार आहे. सकल धनगर समाज “ना नेता, ना पक्ष; धनगर आरक्षण एकच लक्ष” असा नारा घेत सामूहिक नेतृत्वात उपोषण करणार आहेत. हे आंदोलन 1 सप्टेंबर रोजी मल्हारी मार्तंडाच्या जेजुरीतून भंडारा उधळून सुरु होणार आहे व पंढरपूरच्या दिशेने मोठ्या संख्येने धनगर बांधव कुच करणार आहेत. पंढरपूर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये सकल धनगर समाजाच्या वतीने उपोषणाची सुरुवात केली जाईल असे अमोल कारंडे यांनी सांगितले.

Maratha Reservation | नाशिकमध्ये काँग्रेस नेत्यांना अडवणाऱ्या मराठा आंदोलकांवर गुन्हे दाखल

आरक्षण करण्यामागचा हेतू

सध्या राज्यामध्ये मराठा आणि ओबीसी आरक्षणामुळे ठिकठिकाणी आंदोलने होत आहेत. त्याचबरोबर सरकारने लवकरात लवकर निर्णय घ्यावा याकरिता या आंदोलनाच्या माध्यमातून सदर समाजाच्या वतीने राज्य सरकारची डोळे उघडणे करण्याचा प्रयत्न केला जात आहे. तसेच आंदोलनांना राजकीय पक्षांकडून पाठिंबा मिळतानाचे चित्र आहे. परंतु राज्यातील सहाही पक्षांनी धनगर समाजाच्या आरक्षणाबाबत कोणतीच भूमिका घेतलेली दिसून येत नाही. त्यामुळे आता राज्यातील सर्व धनगर समाजाचे कार्यकर्ते आणि नेते आमरण उपोषणाला बसणार आहेत. असे सकल धनगर समाज संघटनेचे समन्वयक अमोल कारंडे यांनी सांगितले.

 


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here