Skip to content

देवपूरपाडे विकास सोसायटीच्या व्हा. चेअरमन पदी यशोदाबाई आढाव


देवपूरपाडे विकास सोसायटीच्या नवनिर्वाचित व्हा. चेअरमन . यशोदाबाई आढाव समवेत संचालक मंडळ

देवळा ; तालुक्यातील देवपुरपाडे येथील कै. देवराम सदा पाटील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीचे तत्कालीन व्हा. चेअरमन नथू राजाराम देवरे यांनी आवर्तन पद्धतीनुसार राजीनामा दिल्यानंतर रिक्त जागेसाठी सर्वानुमते व्हा. चेअरमन पदी यशोदाबाई केदा आढाव यांची निवड करण्यात आली .

निवडणूक निर्णय अधिकारी .नितीन तोरवणे यांच्या अध्यक्ष तेखाली संचालक मंडळाची बैठक बोलाविण्यात आली होती . या बैठकीत सर्वानुमते जेष्ठ संचालिका यशोदाबाई आढाव यांची व्हा . चेअरमन पदी निवड करण्यात आली .

यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अभिमन बापु अहिरे, संचालक भास्कर ठाकरे, अरूण अहिरे , नथू देवरे , भागा आढाव, वसंत अहिरे, राजाराम पवार,अजय अहिरे, सुशिलाबाई अहिरे, ताराबाई अहिरे आदींसह पंचायत समितीचे माजी सभापती. सुकदेव अहिरे, केदा आढाव, बाळू अहिरे, सुभाष आढाव, सुरेश निकम, खंडू आढाव, संदिप सूर्यवंशी, शशिकांत अहिरे, विनायक अहिरे, हर्षद सुर्यवंशी, मधुकर ठाकरे व संस्थेचे सचिव विजय शिंदे उपस्थित होते.नवनिर्वाचित पधादिकार्यांचे आमदार डॉ राहुल आहेर , भाजपचे जिल्ह्द्यक्ष केदा आहेर आदींनी अभिनंदन केले आहे .


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!