Devendra Fadnavis | नाशिक : आज नाशिकमध्ये महायुतीकडून ‘महिला सशक्तीकरण मेळावा’ मोदी मैदान तपोवन येथे आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उपस्थित होते. यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी विरोधकांवर चांगलीच आगपाखड केली आणि महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकारच्या काळातील महिलांवरील अत्याचाराच्या घटनांचा पाढाच वाचून दाखवला.
तिकडे ममता दिदींचे कौतुक आणि इकडे महाराष्ट्र बंद..?
विरोधक बदलापूर सारख्या घटनांचेही हे राजकारण करत असून, 2020-21 साली तुमच्या सरकारच्या काळात ज्या घटना घडल्या तेव्हा तुम्ही का काहीच बोलले नाही. त्या काळात नांदेडला बलात्कार झाला, साकीनाका येथे दुर्दैवी घटना घडली, पुण्यात, बीडमध्ये, सिंधुदुर्ग मध्ये बलात्काराच्या घटना घडल्या. कोविड सेंटरमध्ये बलात्कार झाले. इतकंच काय तर कोविड काळात एका भगिनीच्या गुप्तांगातून स्वॅब काढण्याचा निर्घुण प्रकार घडला तरी तुम्ही काही बोलले नाही.
आताही कोलकात्यात महिला डॉक्टरवर झालेल्या अत्याचाराविरोधातही तुम्ही आवाज नाही उठवला. उलट तुम्ही ममता दिदींचे कौतुक करताय आणि आता राजकीय हेतूने प्रेरित होऊन महाराष्ट्र बंद करताय. तुम्हाला निव्वळ राजकारण करायचे आहे, या शब्दांत देवेनदर फडणवीस यांनी विरोधकांना चांगलेच घेरले.
Devendra Fadnavis | फडणवीसांना केंद्रात मंत्रीपद..?; राज्यात भाजपा नेतृत्वात फेरबदल होण्याची शक्यता
Devendra Fadnavis | तोट्यात असलेली एसटी कशी फायद्यात आली..?
शासकीय योजनांची माहिती देताना फडणवीस यांनी महिलांना देण्यात आलेल्या एसटी तिकीटात महिलांना ५० टक्के सूट या निर्णयाबद्दल सांगताना ५० टक्के सूट असूनही एसटी फायद्यात आली हे नमूद केले. यावेळी ते म्हणाले “एसटी तिकीटात महिलांना ५० टक्के सूट दिल्यामुळे आता आमची बहीण भाऊजींना म्हणते, तुम्ही घरी थांबा..तुम्ही गेले की तुम्हाला जास्त पैसे लागतात. आता तालुक्याच्या तालुक्याच्या जिल्ह्याच्या ठिकाणी आमची बहीन जाऊन काम करून येते.”
आदिवासींना पेसा भरतीचा फायदा मिळवून दिल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही
पेसा भरतीचा प्रश्न आम्हीच सोडवू, सुप्रीम कोर्टातून परवानगी मिळवून लवकरात लवकर नियुक्ती करू. निर्णय घेणारं आणि भरती करणारे हे महायुती सरकारच आहे. उच्च न्यायालयात मान्यता मिळाली पण सुप्रीम कोर्टात स्थगिती आली. मात्र, आमच्या आदिवासी बांधवांना पेसा भरतीचा फायदा मिळवून दिल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही, असा विश्वासही यावेळी देवेनदर फडणवीस यांनी व्यक्त केला. विरोधकांचे काही लोक कालच्या पुण्यातील विद्यार्थी आंदोलनावरून म्हणाले की बांग्लादेशसारखी परिस्थिती निर्माण होईल. बांग्लादेशसारखी परिस्थिती इथे कोणाचा बाप निर्माण करू शकत नही. कारण इथे विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आहे, असेही ते म्हणाले.
Devendra Fadnavis | पराभवाने फडणवीस खचले, उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणार..?
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम