Bus Accident | महाराष्ट्रातील यात्रेकरूंवर काळाचा घाला; ४० जणांसह नेपाळमध्ये बस दरीत कोसळली

0
90

Bus Accident | गोरखपुर मधील केसरवानी ट्रॅव्हल्सच्या बसचा नेपाळमधील तनहून जिल्ह्यातील अबूखैरेनी परिसरात असलेल्या मार्सयांगडी नदीपात्रात पडून भीषण अपघात झाल्याची घटना आज सकाळी 11:30 च्या सुमारास घडली. या बसमध्ये 40 प्रवासी प्रवास करीत होते. त्यातील 14 प्रवाशांचा दुर्दैवी अंत झाला. नेपाळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ही बस गोरखपूर नोंदणीकृत असून ती पोखराहून काठमांडूच्या दिशेने निघाली होती.(Bus Accident)

Rajyasabha Eelection | महायुतीचे दोन नवे खासदार..!; दोन्ही उमेदवारांची बिनविरोध निवड

Bus Accident | महाराष्ट्रातील प्रवाशांचा मृत्यू

40 प्रवाशांना घेऊन ही बस गोरखपूरहून नेपाळला (Nepal) गेली होती. पोखराहून काठमांडूला जाणाऱ्या रस्त्यात या बसला मार्सयांगडी नदीत पडून मोठा अपघात झाला. त्या बसमधील काही प्रवाशांना वाचवण्यात पोलिसांना यश आले तर त्यातील 14 प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती नेपाळ पोलीस अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे. मृत प्रवाशांबाबत अधिक माहिती अजून पर्यंत मिळालेली नसून त्यातील 14 प्रवासी हे महाराष्ट्रातून असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. खराब हवामान व सततच्या पावसामुळे बचाव कार्यामध्ये अडथळे निर्माण होत आहेत.

 


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here