Maharashtra Bandh | महाविकास आघाडीला कोर्टाचा झटका; महाराष्ट्र बंद केल्यास थेट कारवाई होणार

0
68
Maharashtra Bandh
Maharashtra Bandh

Maharashtra Bandh |   बदलापुरमधील एका नामांकित शाळेत एका साडे तीन वर्षांच्या आणि एका सहा वर्षांच्या चिमूकलीवर शाळेच्या सफाई कर्मचाऱ्याने लैंगिक अत्याचार केले. या दुर्दैवी घटनेच्या निषेधार्थ मोठ्या संख्येने बदलापूरकर रस्त्यावर उतरले होते. या आंदोलनाला हिंसक वळणही लागले. दरम्यान, या आंदोलनात सामील अनेक आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून, आंदोलकांची धरपकड पोलिसांकडून करण्यात आली.

या दुर्दैवी घटनेच्या निषेधार्थ आणि आंदोलकांवर दाखल गुन्हे मागे घेण्याच्या मागणीसाठी महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aaghadi) वतीने ‘महाराष्ट्र बंद’ची हाक देण्यात आली होती. २४ ऑगस्ट शनिवार रोजी महाराष्ट्र बंद महाविकास आघाडीच्या वतीने पुकारण्यात आला होता. या बंदविरोधात वकील गुणरत्न सदावर्ते यांनी कोर्टात धाव घेतली होती. यावर आज मुंबई उच्च न्यायलयात सुनावणी पार पडली. या सुनावणीत विरोधी पक्षांना कोर्टाने मोठा झटका दिला आहे. (Maharashtra Bandh)

Maharashtra Bandha | विरोधी पक्षांकडून बंदची हाक; उद्या राज्यात काय बंद काय सुरू असणार..?

Maharashtra Bandh | निर्णय काय..?

बदलापुरातील दुर्दैवी घटनेच्या निषेधार्थ उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीकडून (Mahavikas Aaghadi) ‘महाराष्ट्र बंद’ची पुकारण्यात आला होता. यावर कोर्टाने महत्त्वाचे निर्देश देत महाविकास आघाडीला मोठा धक्का दिला आहे. कोणत्याही राजकीय पक्षाला ‘महाराष्ट्र बंद’ करण्यासाठी परवानगी नाही आणि जर कुणी असा प्रयत्न केला. तर त्या पक्षावर, नेत्यांवर कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायलयाने (High Court) महाराष्ट्र शासनाला दिले आहेत. महाधिवक्ता देवेंद्रकुमार ऊपाध्याय आणि अमित बोरकर यांच्या खंडपीठासमोर याप्रकरणी सुनावणी पार पडली यावेळी त्यांनी हे आदेश दिले आहेत. कोर्टाच्या या आदेशामुळे महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला असून, यानंतर आता विरोधी पक्ष काय काय निर्णय घेणार..? याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेले आहे.

Sharad Pawar | ‘बदलापूर मध्ये कोणता राजकीय पक्ष होता?’; शरद पवारांचा मुख्यमंत्र्यांना सवाल!


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here