सोमनाथ जगताप – प्रतिनिधी : देवळा | भावडबारी घाट ते देवळा या रस्त्याची बिकट अवस्था झाली असून, या मार्गाचे काम गेल्या सहा महिन्यांपासून रखडल्याने रस्त्यावर वाहने चालवणे अवघड झाले आहे. यामुळे वाहनधारकांनी तीव्र संताप व्यक्त केला असून, लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष देऊन तात्काळ रस्त्याचे काम सुरू करून नागरिकांना दिलासा द्यावा. अन्यथा कोणतीही पूर्वसूचना न देता रास्ता रोको आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा शिवसेनेचे (उबाठा) ग्रामीण उपजिल्हा प्रमुख सुनील पवार यांनी एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिला आहे.
Deola | लोहोणेर येथे सरपंचांच्या लेखी आश्वासनानंतर रितेश वाघ यांचे उपोषण मागे
पत्रकाचा आशय असा की, भावडबारी घाट ते देवळा या राज्य महामार्गाचे काँक्रीटीकरणाचे काम गेल्या वर्षभरापूर्वी हाती घेण्यात आले आहे. रामेश्वर फाट्यापर्यंत सात किमी रस्त्याचे काम गेल्या सहा महिन्यांपासून शेतकऱ्यांच्या जमीन अधिग्रहण व मोबदला मिळेल की नाही. याबाबतचा तिढा न सुटल्याने सदरचे दुसऱ्या बाजूचे काम थांबले आहे. एकेरी मार्गावरून शेकडो वाहनांची वाहतूक दररोज चालू आहे. तर उर्वरित रस्त्याची भीषण दुरवस्था झाली आहे.
Deola | देवळ्यात गणेशोत्सव शांततेत पार पाडाव यासाठी शांतता समितीची बैठक संपन्न
अर्धवट कामामुळे वाहनधारकांना तारेवरची कसरत करावी लागत असून, यामुळे छोटे मोठे अपघातदेखील घडत आहेत. याकामी लोकप्रतिनिधींनी दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरीक करीत असून, यावर तात्काळ तोडगा काढावा व उर्वरित अपूर्ण रस्त्याच्या कामाला सुरुवात करावी. अन्यथा शिवसेना स्टाईलने आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा शेवटी शिवसेनेचे ग्रामिण उपजिल्हा प्रमुख सुनील पवार यांच्यासह विजय जगताप, विश्वनाथ गुंजाळ, प्रशांत शेवाळे, सोमनाथ शिंदे, विलास शिंदे, गोरख गांगुर्डे आदींनी दिला आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम