Deola | देशभरात डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंती निमित्त शिक्षक दिन साजरा केला जातो. या दिवशी शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या शिक्षकांचा विशेष सन्मान करण्यात येतो. देवळा तालुक्यातील शिक्षण क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या काही शिक्षकांना विविध पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर, देवळा पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी सतीश बच्छाव यांनी शिक्षक दिनाचे औचित्य साधून देवळा शिक्षण विभागाच्या कार्यालयात विशेष सत्कार समारंभ आयोजित केला. या समारंभात गुणवंत शिक्षकांचा सन्मान लघुवस्त्र, पुस्तक, आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
Deola | ‘वस्तीशाळा ते मॉडेल’ स्कुल करणाऱ्या शिक्षकाच्या कार्याचा राज्य पुरस्काराने गौरव.
समारंभात ज्या शिक्षकांचा गौरव करण्यात आला त्यात जिल्हा परिषदेमार्फत ‘गुणवंत शिक्षक पुरस्कार’ प्राप्त संजय गुंजाळ (फांगदर शाळा), गिरणा गौरव प्रतिष्ठानतर्फे सतीश आहेर (कनकापूर शाळा) आणि किशोर खैरनार (वाजगाव शाळा) यांचा समावेश आहे. त्याचबरोबर रोटरी क्लब ऑफ नाशिक वेस्ट तर्फे घोषित ‘गुणवंत शिक्षक’ पुरस्कार विजेते केशव खैरनार आणि ‘सह्याद्री रत्न पुरस्कार’ सन्मानित भरत पवार यांचाही सन्मान करण्यात आला.
Deola | देवळा येथील कला शिक्षक भारत पवार ‘सह्यादी रत्न’ पुरस्काराने सन्मानित
या कार्यक्रमामुळे शिक्षक वर्गामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. कार्यक्रमाच्या वेळी गटशिक्षणाधिकारी सतीश बच्छाव यांच्यासह शिक्षण विस्तार अधिकारी किरण विसावे, केंद्रप्रमुख पुंडलिक आहेर हे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी गटशिक्षणाधिकारी बच्छाव यांनी गुणवंत शिक्षकांचे कार्य कौतुकास्पद असल्याचे सांगून या वर्षी देवळा तालुक्यातील खंडू मोरे यांना राज्य शासनाचा पुरस्कार जाहीर झाल्याने देवळा शिक्षण क्षेत्रात उत्साह निर्माण झाल्याचे प्रतिपादन केले व सर्व गुणवंत शिक्षकांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम