सोमनाथ जगताप – प्रतिनिधी : देवळा | तालुक्यातील लोहोणेर गावातील विविध मूलभूत सुविधा तात्काळ मार्गी लावण्यासाठी शिवसेनेचे (उद्धव ठाकरे गटाचे) शाखा प्रमुख रितेश वाघ यांनी गुरुवारी दि.५ रोजी ग्रामपंचायत कार्यालसमोर बेमुदत धरणे आंदोलन केले. सरपंच निंबा धामणे यांनी सर्व मागण्यांची दखल घेत तीन महिन्यात मार्गी लावण्याचे लेखी आश्वासन दिल्याने वाघ यांनी आपले आंदोलन मागे घेतले. तीन महिन्यात काम पूर्ण न झाल्यास तीव्र जनआंदोलन उभारू असा इशारा आंदोलनकर्ते रितेश वाघ यांनी यावेळी बोलतांना सांगितले.
Deola | लोहोणेर येथील पायाभूत सुविधांच्या मागणीसाठी उ.बा.ठा. गटाचे उपोषण
लोहोणेर गावात बंद असलेले सीसीटीव्ही कॅमेरे, खालची आदिवासी वस्तीमध्ये पावसाळ्यात साचणाऱ्या पाण्याची विल्हेवाट लावण्यात यावी, आदिवासी वस्तीमधील असलेले शौचालयाची पडझड झाली आहे. यामुळे महिलांची गैरसोय होत आहे. यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. माळीघाटाचे सुशोभीकरण करावे व त्या ठिकाणी देवस्थान असल्याने तिथे कचरा टाकण्यावर ग्रा.पं.ने बंदी करावी, गावाअंतर्गत अपूर्ण रस्ता कॉक्रेटीकरण करावा, पावसाळ्यात उद्भवणाऱ्या साथरोग नियंत्रणासाठी ग्रा.पं.कडून गावात नियमित फवारणी करावी, वरची आदिवासी वस्तीजवळील असलेल्या शौचालयाची दुरावस्था झाली असून त्याची दुरुस्ती करण्यात यावी,
Deola | लोहोणेर येथे बुद्ध पौर्णिमा उत्साहात साजरी
लोहोणेर गावातील स्मशानभूमीतील पत्रा शेडची दुरावस्था व डागडुजी करावी, आदी समस्यांची ग्रामपंचायतीने सोडवणूक करावी या मागणीसाठी शिवसेनेचे (उद्धव ठाकरे गटाचे) शाखा प्रमुख रितेश वाघ यांनी गुरुवारी दि.५ रोजी धरणे आंदोलन केले. ग्रामपंचायतीने याची दखल घेऊन वाघ यांना लेखी आश्वासन दिले. यावेळी सरपंच निंबा धामणे, प्रसाद देशमुख, ग्रामविकास अधिकारी संदीप खेबडे, समाधान महाजन, योगेश पवार, वसंत शेवाळे, पंडित पाठक, अविनाश महाजन, तुषार कोठावदे, मनोहर शेवाळे, गोकुळ अहिरे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम