Skip to content

देवळा शहरात राम जन्मोत्सव धुमधडाक्यात साजरा


देवळा : शहरात राम जन्मोत्सव धुमधडाक्यात साजरा करण्यात आला. रामनवमी निमित्ताने येथील श्रीराम मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले. मंदिराला रंगरंगोटी व विद्युत रोषणाई करण्यात आली होती. मंदिरात दर्शनासाठी भाविकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती . सायंकाळी संपूर्ण शहरातून रथाची मिरवणूक काढण्यात आली.

देवळा येथे रामनवमी निमित्ताने उपस्थित गटनेतेसंजय आहेर, माजी उपनगराध्यक्ष अतुल पवार,नगरसेवक करण आहेर आदी तर दुसऱ्या छाया चित्रात मिरवणुकीत सहभागी तरुण वर्ग (छाया – सोमनाथ जगताप )

यावेळी फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली . मिरवणुकीत देवळा शहरातील पुरुष ,महिला व युवक सामील झाले होते . राम मंदिरात भजन कीर्तन व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते . प्रभू रामचंद्र , सीतामाता, लक्ष्मण ,हनुमाची वेशभूषा बालकांनी साकारली . राम भक्तांनी भगव्या टोप्या घालून उत्सव साजरा केला . यावेळी गटनेते संजय आहेर, माजी उपनगराध्यक्ष अतुल पवार , नगरसेवक करण आहेर ,हितेश आहेर, काका शिंदे , प्रतीक आहेर ,राजेंद्र आहेर, अशोक आहेर आदी उपस्थित होते.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!