देवळा ; क्रीडा भारती या संघटनेने अखिल भारतीय स्तरावर घेतलेल्या क्रीडा ज्ञान स्पर्धा परीक्षेत येथील पब्लिक स्कूलच्या १०१ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता . पैकी इ. १० वीचा खेळाडू करण धुळेने याने ५० पैकी ४४ गुण (वेळ -१५ मिनिटे ) मिळवत अखिल भारतीय स्तरावर गुणवत्ता यादीत आपले स्थान पटकावले.

या यशामुळे त्याचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. यशस्वी खेळाडूचे गटशिक्षणाधिकारी सतिश बच्छाव ,शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अंकुश गिते , प्राचार्य के. डी. पाटील, क्रीडा भारतीचे सर्व पदाधिकारी, शाळेतील सर्व शिक्षक -शिक्षिका,कर्मचारी वृंद यांनी अभिनंदन केले. यशस्वी विद्यार्थीला क्रीडा मार्गदर्शक सुनिल देवरे यांचे मार्गदर्शन लाभले.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम