Skip to content

देवळा तालुक्यात सरसकट पंचनामे करा ; जितेंद्र आव्हाड यवा मंचची मागणी


देवळा ; अतिवृष्टीमुळे देवळा तालुक्यातील पीकांचे नुकसान झाले असून, शासनाने सरसकट पंचनामे करावेत या मागणीचे निवेदन जितेंद्र आव्हाड युवा मंचचे जिल्हाध्यक्ष सचिन सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने तहसीलदार विजय सूर्यवंशी यांना दिले.

शासनाने सरसकट पंचनामे करावीत या मागणीचे तहसीलदार विजय सूर्यवंशी यांना निवेदन देताना जिल्हाध्यक्ष सचिन सूर्यवंशी ,भाऊसाहेब वाघ,बंडू आहेर आदी (छाया -सोमनाथ जगताप )

निवेदनाचा आशय असा की , तालुक्यात प्रामुख्याने कांदा , मका , कोबी , डाळींब या पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव वाढला आहे, अतिवृष्टीमुळे सर्व पिके खराब झाले असून , शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे. शेतामध्ये पाणी साचले असल्याने शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी आलेले पिकं खराब झाली व होता तोंडाशी आलेला घास हिरावून घेतला आहे .यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला असुन,याची दखल घेऊन तात्काळ पंचनामे करावेत अशी मागणी निवेदनात केली आहे.

निवेदनावर जिल्हाध्यक्ष सचिन सूर्यवंशी ,भाऊसाहेब वाघ, बंडू आहेर, पप्पू आहेर , भिला सोनवणे, अनिल आहेर, बाळासाहेब आहेर, रवींद्र निकम, अनिल पगार ,कौतिक आहेर, आण्णा आहेर, अशोक गुजरे ,नानाजी आढाव ,निंबा गांगुर्डे आदींच्या सह्या आहेत .


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!