सोमनाथ जगताप- प्रतिनिधी : देवळा | दिंडोरी लोकसभा मतदार संघाचे खासदार भास्कर भगरे यांनी दि. १३ रोजी खामखेडा येथील फांगदर या उपक्रमशील शाळेला भेट देत शाळेचे विविध उपक्रम जाणून घेतले. खासदार भास्कर भगरे यांनी नुकतीच शाळेला भेट देत शाळेने प्रतिकूल परिस्थितीत कशा पद्धतीने भौतिक विकास घडवून आणला. तंत्रज्ञानाच्या मदतीने मुल कशी शिकतात व शाळा स्तरावर सुरु असलेले विविध उपक्रम ह्या बाबी प्रत्यक्ष समजून घेतल्यात.
शाळेतील विद्यार्थी करत असलेल्या विविध उपक्रमांची घेतली दखल
शाळेतील प्रत्येक वर्गातील विध्यार्थ्यांना ज्ञानरचनावादी साहित्याच्या मदतीने कशा पद्धतीने अध्यापन केले जाते. शाळेत असलेल्या अलेक्साडॉल सोबत विध्यार्थी कशा प्रकारे संभाषण करतात व तिची कार्यपद्धती समजून घेतली. शाळेचे शिक्षणाच्या वारीतील वाटचाल, डिझाईन फॉर चेंज उपक्रमातील उपक्रम व त्या उपक्रमांचा शाळेला झालेला फायदा व विध्यार्थ्यांना राष्ट्रीय स्तरावर मिळालेली संधी या गोष्टी त्यांनी सविस्तर जाणून घेतल्या. शाळेने केलेल्या विमान प्रवास तसेच नाविन्यपूर्ण बाबी त्यांनी यावेळी शिक्षकांकडून जाणून घेतल्या.
यांनी दर्शवली उपस्थिती
यावेळी मविप्रचे देवळा तालुका संचालक विजय पगार, चांदवड तालुका संचालक डॉ. सयाजी गायकवाड, माध्यमिक शिक्षक बँकेचे संचालक एस टी पाटील, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दिगंबर हिरे, सोनजी पवार, निंबा शेवाळे, नानाजी पवार, प्रवीण मोरे, सोपान भदाणे, धनंजय शेवाळे, चंद्रकांत सूर्यवंशी, गणेश शेवाळे शिक्षक संजय गुंजाळ, खंडू मोरे यावेळी उपस्थित होते.
“ग्रामीण भागातील अतिशय दुर्गम भागात द्विशिक्षकी शाळेने अतिशय प्रतिकूल परिस्थितीत लोकसहभागातून साधलेला विकास व शिक्षकांनी विविध नाविन्यपूर्ण उपक्रमातून विध्यार्थ्यांचा साधलेला गुणवत्ता विकास या शाळेत पहायला मिळाला. खाजगी शाळांना देखील लाजवेल असा बदल दोघा शिक्षकांनी घडवून आणला आहे.”
भास्कर भगरे, खासदार.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम