सोमनाथ जगताप- प्रतिनिधी: देवळा | तालुक्यातील उमराणे येथे आमदार डॉ. राहुल आहेर यांच्या उपस्थितीत बांधकाम कामगार मेळाव्यात कामगारांना सुरक्षा किट व गृहउपयोगी साहित्याचे वाटप करण्यात आले. शासन बांधकाम कामगारांसाठी विविध योजना राबवत असून त्याचाच एक भाग म्हणून सुरक्षा किट व गृहउपयोगी साहित्याचे वाटप केले जात आहे. रविवारी दि. २२ रोजी उमराणे येथे बांधकाम कामगार मजदूर मेळाव्याचे आयोजन बाजार समितीचे सभापती प्रशांत देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजन करण्यात आले होते, यावेळी आमदार डॉ. राहुल आहेर यांच्या हस्ते या साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी सभापती प्रशांत देवरे यांनी उपस्थितांना मेळाव्याची व बांधकाम साहित्य तसेच गृहउपयोगी भांडी संच साहित्य व शासनाच्या विविध योजनांची माहिती दिली.
Deola | परिपूर्ण आणि संतुलित जीवनसाठी चांगले मानसिक आरोग्य राखणे गरजेचे – प्राचार्य डॉ. रसाळ
“गरीब जनतेला होणारा लाभ हाच आमच्या सरकारचा ध्यास”- डॉ. आहेर
आमदार डॉ. आहेर यांनी केंद्र व राज्य सरकार अनेक विविध योजना राबवत असून बांधकाम कामगारांचा परिपूर्ण विकास तसेच विविध योजना व गरीब जनतेला होणारा लाभ हाच आमच्या सरकारचा ध्यास असून बांधकाम कामगारांचे साहित्य तसेच गृहउपयोगी भांडी संच साहित्य सर्व गोरगरीब कामगार मजदूर यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा शासनाचा मानस असून या विविध योजनांचा सर्वांनी लाभ घ्यावा असे सांगितले.
Deola | राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या ग्रामीण जिल्हा अध्यक्षपदी मधुकर अहिरे यांची नियुक्ती
याप्रसंगी सरपंच कमल देवरे, भाजपा महिला आघाडीच्या बबीता देवरे, बाजार समितीचे सभापती प्रशांत देवरे, दिलीप देवरे, भाऊसाहेब देवरे, ललित देवरे, दादा गोधडे, नामदेव खैरनार, कैलास देवरे, संदीप देवरे, भिला देवरे, बंडूकाका देवरे, भरत देवरे, डॉ. गोरख केदारे, राजू शिरसाठ, बापू जमदाडे, शांताराम देवरे, राजू देवरे, वैभव देवरे ,मयूर देवरे, मयूर नेराळे, भाऊसाहेब देवरे, संदीप शिरसाठ आदी ग्रामस्थ उपस्थित होते. सूत्रसंचालन सुनील देवरे यांनी केले.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम