सोमनाथ जगताप – प्रतिनिधी: देवळा | तालुक्यातील वाखारी येथील सरपंच, उपसरपंच यांच्या मनमानी कारभाराला कंटाळून बुधवार दि. २८ रोजी देवळा तहसीलदारांकडे दोन विरुद्ध दहा सदस्यांनी अविश्वास प्रस्ताव दाखल केला होता. आज मंगळवारी दि. ३ रोजी ग्रामपंचायत सभागृहात या अविश्वास प्रस्तावबाबत तहसीलदार मिलिंद कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभा झाली. त्यात चर्चा होऊन अकरा विरुद्ध दोन मतांनी अविश्वास प्रस्ताव संमत झाला.
Deola | देवळ्यात बैलपोळा मोठ्या उत्साहात साजरा
Deola | सरपंच, उपसरपंचांचा मनमानी कारभार
याबाबत देवळा तालुक्यातील वाखारी येथील सरपंच, उपसरपंच यांच्या विरोधात दाखल करण्यात आलेल्या अविश्वास प्रस्तावावर सरपंच, उप सरपंच हे सदस्यांना विश्वासात न घेता मनमानी कारभार करतात, गावाच्या विकासाठी वेळोवेळी ठोस निर्णय घेत नाहीत, ग्रामपंचायतीचा कारभार एकतर्फी चालवतात, ते गावाच्या दृष्टीकोनातून काम करत नाही. या कारणावरून त्यांच्यावर तहसील कार्यालयात अविश्वास ठराव दाखल केला होता. तो मंगळवारी झालेल्या विशेष सभेत संमत झाला. यामुळे गावात राजकीय खळबळ उडाली आहे.
Deola | देवळा नगरपंचायतीची पथविक्रेता समिती सदस्यांची निवडणूक बिनविरोध
यावेळी ग्रामपंचात सदस्य कल्पना चव्हाण, पुनाजी भदाणे, धुडकु अहिरे, सुनीता गुंजाळ, अलका पवार, बाजयाबाई वाघ, रवींद्र वाघ, आक्काबाई वाघ, उज्ज्वला अहिरे, विलास पवार आदी सदस्य उपस्थित होते. (Deola)
“वाखारी गावात रोजगार हमी योजनेतून रस्त्याची कामे सुरू असून, मजूर, हजेरी रजिस्टर न ठेवता जेसीबीच्या साहायाने केली आहेत. त्याचे पेमेंट काढून देण्यासाठी आमच्यावर अविश्वास ठराव दाखल केला. तसेच ग्रामसेवक स्वतः ठेकेदार आहेत.आम्ही सर्व सदस्यांना विश्वासात घेऊन कामकाज केले आहे. विरोधकांनी आमच्यावर बिनबुडाचे आरोप केले आहेत. संबंधित कामांची चौकशी करण्यात यावी, अन्यथा ग्रामपंचायत कार्यालयासमोर उपोषण करण्यात येईल.”
मंगेश आहेर, (उपसरपंच, वाखारी ग्रामपंचायत)
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम