Deola | खर्डे येथे “स्वच्छता हि सेवा” अभियान

0
16
#image_title

सोमनाथ जगताप- प्रतिनिधी: देवळा | खर्डे ता.देवळा ग्रामपंचायतीच्या वतीने स्वच्छता हि सेवा अभियान राबविण्यात आले. शासनाच्या वतीने मंगळवार दि. १७ पासून स्वच्छता पंधरवडा अभियानाला सुरुवात करण्यात आली. त्या अनुषंगाने खर्डे ता. देवळा ग्रामपंचायतीच्या वतीने गावात स्वछता मोहीम राबविण्यात आली.

Deola | कणकापूर विकास सोसायटीची वार्षिक सर्वसाधारण सभा सम्पन्न

ग्रामपंचायत परिसरात या उपक्रमाला सुरवात करण्यात येऊन स्वछता पंधरवाड्याची जनजागृती करण्यात आली. यावेळी सरपंच जिभाऊ मोहन, उपसरपंच सुनील जाधव आदींसह सर्व सदस्य, इंदिरा गांधी विद्यालयातील विद्यार्थी, आशा सेविका, ग्रामविकास अधिकारी योगेश पगार, शिपाई अशोक सोळशे इतर कर्मचारी उपस्थित होते.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here