Deola | कणकापूर विकास सोसायटीची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न

0
30
#image_title

सोमनाथ जगताप- प्रतिनिधी: देवळा | कनकापूर विविध कार्यकारी सहकारी सोसायटीची वार्षिक सर्वसाधारण सभा शुक्रवारी दि.२० रोजी चेअरमन नामदेव शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली. यावेळी थकबाकी वसुलीबाबत लेखापरीक्षकाची नेमणूक करणे, ३१ मार्च २०२४ च्या लेखापरीक्षण दोषदुरुस्ती अहवाल मंजूर करणे, आर्थिक बजेट मंजूर करणे आदी विविध विषयांवर सकारात्मक चर्चा करण्यात आली.

Deola | विज्ञान नाटिकेच्या राज्यस्तर निवडीबद्दल गटशिक्षणाधिकारी सतीश बच्छावांकडून यशस्वी विद्यार्थी व शिक्षकांचा सत्कार

सचिव पुंडलिक आहेर यांनी अहवाल वाचन केले

यावेळी व्हा.देवाजी शिंदे , संचालक बापू शिंदे, किशोर सावकार, दादाजी शिंदे, दशरथ मोहिते, अशोक शिंदे, निबा बर्वे, निर्मला शिंदे, दिनकर शिंदे, कडू शिंदे, अनिता शिंदे, काळू पवार आदींसह सभासद उपस्थित होते. अहवाल वाचन सचिव पुंडलिक आहेर यांनी केले.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here